अभिनेते होण्या अगोदर बँकेत कॅशिअर होते CID चे एसीपी प्रद्युमन, अशी झाली अभिनय क्षेत्राची सुरुवात

अभिनेते होण्या अगोदर बँकेत कॅशिअर होते CID चे एसीपी प्रद्युमन, अशी झाली अभिनय क्षेत्राची सुरुवात

शिवाजी साटम हे CID मालिकेतल्या एसीपी प्रद्युम्न यांचे खरे नाव आहे. परंतु ते प्रत्येक प्रेक्षकांच्या घरोघरी एसीपी प्रद्युम्न म्हणून ओळखले जातात. सर्व वयोगटातील लोक त्यांना याच नावाने ओळखतात. मंग ते मुल असतील किंवा वयस्कर. विशेष म्हणजे 21 एप्रिल रोजी शिवाजी साटम यांचा वाढदिवस असतो.शिवाजी साटम यांनीही आपल्या कारकीर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट केले आहेत, ज्यात त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले.

‘वास्तव’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘सूर्यवंशम’ आणि ‘नायक’ हे त्यांचे हिट चित्रपट आहेत. परंतु त्यांनी बजावलेल्या एसीपी प्रद्युम्नच्या व्यक्तिरेखेला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. शिवाजी साटम यांनी सुमारे 35 चित्रपटांत काम केले. शिवाजी साटम हे अजूनही पूर्ण शक्तीने अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. ते इतके लोकप्रिय झाले आहेत की त्यांच्या नावाने विनोद आणि मिम्स देखील बनविले जातात.

बँक कॅशियरने करिअरची सुरुवात – शिवाजी साटम यांना असे कधीच वाटले नव्हते की ते असे लोकप्रिय अभिनेते होतील.1950 मध्ये मुंबईत जन्मलेले शिवाजी साटम हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये रोखपाल होते. एकदा, त्यांनी बँक इंटर स्टेज स्पर्धेत एका नाटकात भाग घेतला, जिथे त्याचे जीवनच पलटले.

शिवाजी साटम यांचे शिक्षण – अभिनयाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी शिवाजी साटम यांचे संपूर्ण लक्ष बँकेच्या नोकरीवर आणि त्या अगोदर अभ्यासाकडे. शिवाजी साटम हे अभ्यासात खूप हुशार होते. तसेच त्यांनी फिजिक्स मधून ग्रॅज्युएट आणि बिजनेस एडमीनिस्ट्रेशन मध्ये डिप्लोमा प्राप्त केला आहे.

अभिनयामध्ये यशस्वी होण्यामाघे शिवाजी साटम हे त्यांच्या चांगले अभ्यासाला उपयुक्त मानतात. त्यांचा असा विश्वास आहे की चांगल्या शिक्षणाशिवाय कोणत्याही क्षेत्रात करियर करणे कठीण आहे. म्हणूनच चांगले शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे.

रामायणातील दशरथ राजाच्या पात्राने अभिनेते झाले – शिवाजी साटम यांना अभिनेता बनविण्यात रामायणातील दशरथ राजाच्या पात्राने खूप योगदान दिले आहे. रामायण मालिकेत दशरथ बनलेल्या बाल धुरीने आपली अभिनय क्षमताच दाखविली नाही तर प्रेरणा देखील दिली.

बाल धुरीने त्यांच्या संगीत नाटकातील संगीत वरदमध्ये शिवाजी साटम यांना पहिला ब्रेक दिला. 1988 मध्ये शिवाजी साटम यांचा पहिला हिंदी चित्रपट ‘पेस्टोनजी’ होता. हिंदीशिवाय शिवाजी साटम यांनी मराठी आणि इंग्रजी चित्रपटांमध्येही काम केले आहे.

असेच लेख वाचण्यासाठी आत्ताच आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral