अर्चना रस्त्यावर कारमध्ये ‘रोमान्स’ करतांना पडकली गेली होती, पोलीसांनी केली होती विचारपूस !

अभिनेत्री अर्चना पूरन सिंह ही कपिल शर्मा शोमध्ये नवज्योतसिंग सिद्धूच्या जागेवर दिसत आहे आणि अलीकडेच तिने आपल्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करणाऱ्या कलाकारांशी संवाद साधताना अर्चनाने एक अतिशय वैयक्तिक किस्सा शेअर केला. अर्चना पूरनसिंग ने शोमध्ये हे उघड केले की तिला आणि तिचा नवरा परमीत सेठी यांना रात्री उशिरा पोलिसांनी पकडले होते आणि या परिस्थितीतून ती कशीबशी बाहेर पडली.
वस्तुतः कपिल शर्मा शोमधील कलाकारांना कुठल्याही संस्मरणीय रोमँटिक क्षणांबद्दल विचारत होता आणि यादरम्यान अर्चनाने सांगितले की ती एकदा परमीतसोबत लाँग ड्राईव्हवर गेली होती आणि दोघेही रात्री उशिरा कारमध्ये रोमांस करत होते.
अर्चना पुढे म्हणाली, ‘याच दरम्यान एक पोलिस कर्मचारी त्यांच्या कारजवळ आला आणि त्यांने गाडीच्या काचावर बोटाने ठोठावले. पोलिस आल्यावर अर्चना खूप घाबरली होती. दोघांनीही विवाहित असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तिला ही घटना नेहमी आठवते.
अशाप्रकारे रस्त्यावर रोमान्स करणे खूप धोकादायक असल्याचेही आपल्याला यावरून समजत आहे. अर्चनाचे म्हणणे आहे की पावसाळ्यात रोमान्स करायला खूप चांगले वाटते.अर्चना पूरन सिंह आणि परमितने प्रेम विवाह केला आहे आणि दोघांचे प्रेमप्रकरण हे एका कार्यक्रमादरम्यान सुरू झाले होते.
परत नात्यात पडणार नाही असा निर्णय घेतला होता – अर्चना पूरन सिंहने पाहिले लग्न मोडल्यानंतर असा निर्णय घेतला होता की आता ती नात्यात अडकणार नाही, पण परमीतला भेटल्यानंतर दोघेही प्रेमात बुडाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. काही काळ लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर या जोडप्याने 30 जून 1992 रोजी लग्न केले.
कपिलने सुद्धा सांगितला किस्सा – कपिल नेहमीच त्याच्या शोमध्ये कोणत्या ना कोणत्या अभिनेत्रीबरोबर फ्लर्ट करतांना दिसतो. त्याने आपल्या जुन्या मैत्रिणीचा एक किस्सा देखील शेअर केला. ज्यामध्ये त्याने सांगितले की त्याची मैत्रीण त्याला नेहमी दुधाचे पाकिटे गिफ्टमध्ये देत असे. नुकताच कपिल शर्मा शोला आयटीए अवॉर्ड्स 2019 मध्ये बर्याच पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. शोने बेस्ड कॉमेडी शो चा पुरस्कार जिंकला आहे.