आंतरराष्ट्रीय बॉक्सरला मानसी नाईक करतेय डेट, पहा फोटो

बॉलिवूड कलाकार म्हणा किव्हा मराठी कलाकार त्यांच्या लव्ह लाइफबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये भरपूर प्रमाणात असते. आपल्याला आवडणारे कलाकार नेमके कोणाच्या प्रेमामध्ये आहे. त्यांच्या लव्ह लाइफमध्ये काय सुरु आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांना असते.
मराठीती इंडस्ट्री मधली अभिनेत्री व डान्स क्वीन मानसी नाईक ही फॅशनमध्येही अव्वल आहे. डान्स व अऩेक वेळा फॅशऩमुळे ती चर्चेत राहिलेली आहे. परंतु ती आता मात्र दुसऱ्याच कारणासाठी चर्चेत आहे.
मानसी नाईकचा 2 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. आणि त्या दिवशी चाहत्यांनी तिला शुभेच्छा देत तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. आणि वाढदिवस स्पेशल म्हणून तिने तिच्या चाहत्यांनाच एक खास गीफ्ट दिलं आहे. मानसीने तिच्या प्रेमाचा खुलासा सर्वांसमोर केला आहे. मानसीने चक्क तिच्या बॉय़फ्रेंड बरोबरचा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत तिने या फोटोला छानसं कॅप्शनही दिलं आहे. कॅप्शन देताना मानसीने लिहिलं आहे, ” यावर्षी वाढदिवसाला मी स्वत: लाच गीफ्ट द्यायचं ठरवलं आहे. प्रेम आणि कमिटमेंटसोबत मी हे गीफ्ट द्यायचं ठरवलं आहे आणि ओळखा ते काय आहे . प्रेमळ, विश्वासू आणि कमिटेड व्यक्ती. मी प्रेमात पडले आहे प्रदीप खरेरा तुझं माझ्या जगात स्वागत आहे. हॅपी बर्थडे टु मी !”
या कॅप्शनसह मानसीने तिच्या प्रेमाची कबुली जगासमोर केली आहे. मानसी आणि प्रदीप यांचा फोटो रोमॅंटिक आणि कपल गोल्स देणारा आहे. या क्युट फोटोवर चाहत्यांनी कमेंट आणि लाइक्ससह शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
प्रदीप खरेरा हा आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. त्याचसोबत प्रदीप मॉडेल आणि अभिनेताही आहे. मानसी नाईकने तिच्या नृत्याने अनेकांना घायळ केले आहे. उत्तम नृत्याने तिने अऩेक सुपरहिट गाणी केली. प्रतिकनेही त्याच्या अकाउंटवर मानसीसोबतचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे.