‘आई कुठे काय करते’ च्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

‘आई कुठे काय करते’ च्या प्रेक्षकांसाठी वाईट बातमी

देशात करोना महामारीची तिसरी लाट आली असून, सर्वसामान्यांपासून ते अगदी कलाकार, मंत्र्यांपर्यंत सर्वजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. अनेक कलाकार तसेच त्यांची लहान मुले यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे.

आता छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मधील अभिनेत्रीला करोनाचा संसर्ग झाला आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेती प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण संजनाची भूमिका साकारणाऱ्या रुपाली भोसलने अनेकांची मने जिंकली आहेत.

आता रुपालीला करोनाची लागण झाली आहे. तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.रुपालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला एक स्टोरी पोस्ट केली आहे. ‘सर्वप्रकारची काळजी घेऊनही माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

मी करोना नियमांचे पालन करत असून घरातच स्वत:ला क्वारंटाइन करुन घेतले आहे. मी लवकरच करोनावर मात करेन. कृपया सुरक्षित रहा आणि मास्क लावा. तुमची आणि इतरांचीही काळजी घ्या’ या आशयाची पोस्ट रुपालीने केली आहे.

देशात करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे आणि या महिन्याच्या अखेरीस ते करोनाची तिसरी लाट पीकवर असेल. आयआयटी कानपूरचे प्राध्यापक महेंद्र अग्रवाल म्हणाले की, या काळात देशात दररोज ४ ते ८ लाख रुग्ण संख्या आढळू शकतात.

इतकेच नाही तर कडक निर्बंधांमुळे ही लाट काही काळानंतर नक्कीच येईल, पण नंतर ती दीर्घकाळ राहील, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. लॉकडाउनसारख्या निर्बंधांशिवाय करोना विषाणूचा संसर्ग थांबणार नाही, हे या अंदाजावरून स्पष्ट होते.

याशिवाय गतवर्षीप्रमाणे या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण पडणार नाही.

Team Hou De Viral