आणि या कारणामुळे प्रिया बेर्डे अभिनया व्यतिरिक्त करतात हा व्यवसाय, वाचा सविस्तर !

सध्याची कलाकार मंडळी मालिका तसेच सिनेमात अभिनय करण्या बरोबरच इतर गोष्टींत सुद्धा विशेष असे लक्ष देत आहेत.
अभिनया बरोबरच स्वतःचा आपला व्यापार करण्याचा ट्रेंड आता मराठी कलाकरांमध्येही वाढला आहे. तेजस्विनी पंडित तसेच अभिज्ञा भावे या दोन मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वतःचे फॅशन ब्रँड तयार केले.
यांच्याप्रमाणेच अभिनेत्री प्रिया मराठे हिचे सुद्धा मुंबईतील मिरा रोड या ठिकाणी स्वतःचं कॅफे आहे. परंतु आता या यादीत आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव मोजले जाणार आहे.
जुन्या काळातील अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सुद्धा हॉटेलचा व्यवसाय सुरू केला आहे. मुळात प्रिया बेर्डे यांना कुकिंगची जबरदस्त आवड आहे. वेगवेगळे पदार्थ तयार करणे आणि ते इतरांना खाऊ घालणे हा त्यांचा एक आवडता छंद आहे. आणि या छंदाचे व्यवसायात रूपांतर व्हावे अशी त्यांची ईच्छा होती.
पुणे मधील बावधन या परिसरात मराठा मंदिराजवळ “चख ले” या नावाने त्यांनी आपले स्वतःचे रेस्टॉरंट सुरू केले आहे. विशेष म्हणजे “पप्पू डोसा” ही इथली स्पेशालिटी आहे.
इथल्या पदार्थांची चव चाखायला ठिकठिकाणचे खवय्ये याठिकाणी येऊन भेट देताता. शिवाय प्रिया बेर्डे देखील आपल्या बिझी शेड्युल मधून वेळ काढून आपल्या रेस्टॉरंटला आवर्जुन हजेरी लावतात.
त्यांच्या रेस्टॉरंट मधील वेगवेगळ्या आणि चविष्ट पदार्थांची मागणी वाढल्याने या व्यवसायाने आता चांगलाच जम बसवलेला पाहायला मिळतो आहे.