आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी श्रद्धा मागच्या 6 वर्षांपासून एक गंभीर आजारानं ग्रस्त आहे.

आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारी श्रद्धा मागच्या 6 वर्षांपासून एक गंभीर आजारानं ग्रस्त आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या 6 वर्षांपासून चिंता सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत आहे. तिने एका मुलाखती दरम्यान हा मोठा असा धक्कादायक खुलासा केला आहे.श्रद्धा कपूरने सांगितले आहे की आपल्याला Physical Anxiety आजाराबद्दल बरेच दिवस माहित नव्हते परंतु जेव्हा तिला याबद्दल कळले तेव्हा ती स्वतः आश्चर्यचकित झाली.

साहो ची अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने नुकतीच इंग्रजी वेबसाइट पिंकविला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने ‘साहो’ चित्रपटासह वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चा केली.आपल्या आजारपणाबद्दल बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली- ‘मला दीर्घ काळापासून Physical Anxiety आजाराबद्दल माहित नव्हत. मला आशिकी 2 नंतर मला वेदना होत होत्या परंतु तपासणी दरम्यान काहीही समोर आले नाही.श्रद्धा कपूर पुढे म्हणाली- ‘यानंतर मी आणखी बऱ्याच चाचण्या केल्या, परंतु डॉक्टरांच्या अहवालांमध्ये माझ्या कोणताच आजाराचा खुलासा झाला नाही. मी आश्चर्यचकित झाले कारण मी वारंवार असा विचार करत होते की मला असा त्रास का होत आहे.मग थोड्या वेळानंतर मला Physical Anxiety जाणवू लागला. मी अजूनही Physical Anxiety ह्या आजाराशी लढत आहे, पण आता मी पूर्वीपेक्षा चांगली आहे. ‘

याशिवाय श्रद्धा कपूर अजून बरीच चर्चा केली. आजकाल श्रद्धा कपूरचा चित्रपट ‘साहो’ चित्रपटगृहात चांगला कलेक्शन करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत दक्षिण सिनेमाचा सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत आहे. गेल्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘साहो’ चित्रपटाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत, तर या चित्रपटावर समीक्षकांनी टीका केली होती.‘साहो’ चित्रपटाच्या कलेक्शन बद्दल बोलताना गुरुवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाली. बॉक्स ऑफिस इंडियाच्या वेबसाइटनुसार चित्रपटाने बुधवारी 1.75 कोटींची कमाई तर एकूण 136 कोटींची कमाई केली आहे. यात प्रभास आणि श्रद्धा कपूर यांच्याशिवाय नील नितीन मुकेश, चंकी पांडे, महेश मांजरेकर आणि जॅकी श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘साहो’ साजे दिग्दर्शन सुजित यांनी केले आहे.

Team Hou De Viral