आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे देणारा आवळ्याचा मुरांबा खाल, तर आजारी पडणंच विसरून जाल!

आरोग्याला एक नाही तर अनेक फायदे देणारा आवळ्याचा मुरांबा खाल, तर आजारी पडणंच विसरून जाल!

आवळ्याचा आहारात समावेश केल्यानंतर तुम्ही औषधाच्या सेवनापासून दूर राहू शकता. आतापर्यंत तुम्हाला आवळ्याचे त्वचेला आणि शरीराला होणारे फायदे माहित असतील आज आम्ही तुम्हाला आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याचे फायदे सांगणार आहोत. आवळ्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. हे सर्व घटक आजारांपासून आपला बचाव करतात.

आवळे हे हिरव्या रंगाचे तुरट व आंबट चवीचे, शरीरासाठी लाभदायक असतात. आवळा शरीर डिटॉक्सीफाय करण्यासाठी महत्वाचा समजला जातो. आवळ्याच्या सेवनाने शरीरातील विषारी घटक बाहेर पडत असतात. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने डोळे चांगले राहतात. डोळ्यांना तेज येण्यासाठी मुरांबा आवर्जून खावा.

त्वचेसाठी फायदेशीर

आवळ्याचा मुरांबा नियमित खाल्ल्याने आपल्या चेहऱ्यावर कमी वयात सुरकुत्या येत नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावर मुरूम येत नाही. सतत तोंड येत असेल तर आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने चेहऱ्याला ग्लो येतो. तसेच त्वचा रोग दूर होण्यास मदत होते.

पचनक्रिया व्यवस्थित राहते

आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने एसिडीटीच्या त्रासापासून पासून मुक्तता मिळते. भूक वाढते आणि पचनशक्ती देखील चांगली होते. एक मोठा चमचा आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने सर्दी, खोकला अशा आजारांमध्ये त्वरित आराम मिळतो. पोट साफ होण्यास मदत होते. ( हे पण वाचा-सावधान! हृदयाचे ठोके थांबवू शकतं नसांमध्ये जमा असलेलं कॉलेस्ट्रॉल, जाणून घ्या उपाय )

हृद्याच्या आाजारांपासून लांब राहता येतं

आवळ्याचा मुरांबा नियमीतपणे खाल्ल्याने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नियमितपणे आवळ्याचा मुरांबा खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते आणि हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. नियमितपणे मुरांबा खाल्ल्याने हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

Team Hou De Viral