उन्हाळ्यात आपले शरीर ‘कूल’ ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात ‘या’ भाज्या

उन्हाळ्यात आपले शरीर ‘कूल’ ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात ‘या’ भाज्या

सध्या उन्हाळा ऋतू सुरू झाला आहे आणि तापमानानं पार आता कळस गाठला आहे. उन्हाळ्यात प्रत्येकानं आपल्या डाएटकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. जर तुम्ही उन्हात बाहेर निघत असाल आणि उन्हापासून रक्षण करायचं असेल, तर आपल्या आहारात या ‘६’ भाज्यांचा वापर आवश्यक आहे.

दुधीभोपळा – उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळा खाणं कुणाला आवडणार नाही. दुधीभोपळ्यामुळे पोटाचे सर्व आजार दूर होतात. तसंच अॅसिडिटी आणि अपचन सारख्या समस्याही दूर होतात.

बीन्स – उन्हाळ्यात बीन्स खाल्ल्यानं शरीराला ओमेगा-३ फॅटी अॅसिड मिळतं. सोबतच यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे की हृदयासाठी चांगलं असतं.

शिमला मिर्ची – हिरव्या रंगाची ही भाजी खूप व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट युक्त असते. शिमला मिर्ची नियमित खाल्ल्यानं आपण हार्ट अटॅक, दमा आणि मोतीबिंदू सारख्या आजारांपासून बचाव करू शकता.

काकडी – काकडीमध्ये ९६ टक्के पाणी असतं आणि काकडी शरीराला थंड ठेवते. काकडीमध्ये खूप पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि फायबर असतं.

भोपळा – उन्हाळ्यात अनेक आजारांची भीती असते त्यामुळं आहारात अशा भाज्या असाव्यात ज्यातून खूप पोषण मिळेल. त्यासाठी भोपळ्याची भाजी अवश्य आहारात असावी. लाल भोपळा खाल्ल्यानं पोट स्वच्छ राहतं. पोटातील कृमि सुद्धा नष्ट होते. यात पोटॅशियम आणि फायबर खूप प्रमाणात असतात. भोपळ्यामुळे ब्लड प्रेशर पण कंट्रोलमध्ये राहतं.

पालक – पालकामध्ये आयर्न सोबतच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, लोह आणि व्हिटॅमिन ए, बी, सी इत्यादी खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. या सर्व गुणांमुळे पालकाला जीवन रक्षक म्हटलं जातं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team Hou De Viral