एका जाहिरातने 6 वर्षाच्या मुलीचे आयुष्य बदलले, अभिषेक बच्चन यांच्यासमवेत चित्रपटात संधी मिळाली !

एका जाहिरातने 6 वर्षाच्या मुलीचे आयुष्य बदलले, अभिषेक बच्चन यांच्यासमवेत चित्रपटात संधी मिळाली !

जेव्हा ती छोटी मुलगी आपल्या मित्रांची तक्रार करत तिच्या आईला म्हणाली, “वो क्या समझती है अपने आप को, मेरे खिलाफ षडयंत्र रचेगी”, तर तुम्हीते पाहून नक्की हसाला असाल. खरं तर डिस्नेच्या प्रमोशनल अ‍ॅडमध्ये दिसणारी ही सहा वर्षाची इनायत वर्मा आपल्या अभिनयामुळे चर्चेत आली आहे.

लुधियानाची रहिवासी असलेली इनायत वर्माने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी प्रेक्षकांमध्ये आपली ओळख निर्माण केली होती. नाटक क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या इनायतला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अलीकडेच इनायतने डिस्ने, एचपी प्रिंटर्स, गुड नाईटच्या एडमध्ये काम केले आहे.

डिजनीच्या जाहिरातीत आपल्या आईला टीव्हीचे प्रोग्रॅम बघून शिकलेला डायलॉग बोलते,

“क्या समझती है वो अपने आप को, मेरे खिलाफ षडयंत्र रचेगी, उसका पाला मुझसे पड़ा है, वो मेरे पंजे से बच नहीं पाएगी. बस….देखती जाओ मां”

या जाहिरातीमध्ये इनायत चा अभिनय आश्चर्यकारक आहे.याशिवाय इनायत वर्मा हिने एचपी प्रिंटरच्या एडमध्येही जबरदस्त कामगिरी केली आहे. या छोट्या मुलीने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी प्रेक्षकांमध्ये चांगली फॅलो फॉलोव्हिंग मिळवली आहे.

अभिनयाच्या या जगात इनायत हळूहळू जागा मिळवत आहे. तिची आई मोनिका वर्मा यांनी एका मनोरंजन पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या 4 व्या वर्षापासूनच इनायतचा अभिनयाकडे कल आहे. ती टीव्ही शोची काही पात्रंही करायची. जेव्हा तिची आई तिच्याशी बोलते, तेव्हा ती तिचे अनुकरण करते.

सुरुवात कशी झाली

इनायतचा पहिला कार्यक्रम हा ‘सबसे बडा कलाकार’ हा होता. तथापि, या शोमध्ये इनायत केवळ टॉप -10 लिस्ट मध्ये पोहोचली. पण तिने शोचे जज बोमन इराणी, रवीना टंडन आणि अरशद वारसी यांची मने जिंकली होती.

इनायत लुधियानाच्या सिव्हिल लाइन्स येथे असलेल्या कुंदन विद्या मंदिर प्रशालेची विद्यार्थी आहे. अभिनयात नशीब आजमावण्यासाठी घराकडून पाठिंबा मिळाला, तेवढाच शालेय लोकांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला.

लवकरच चित्रपटात काम करणार

एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीनुसार, इनायत लवकरच बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोबत एका चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच, किचन चॅम्पियन शोमध्ये ती बाल जज म्हणून दिसली आहे.

इनायतने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसोबत स्टेज शेअर केला आहे. एकदा तिने सलमान खानची मुलाखतही घेतली होती. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की तिला आलिया भट्ट सारख व्हायचं आहे.

Team Hou De Viral