एवढ्या वर्षांनंतर इतका बदल झाला आहे या मराठी अभिनेत्री मध्ये; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

एवढ्या वर्षांनंतर इतका बदल झाला आहे या मराठी अभिनेत्री मध्ये; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

कसली ही भूमिका असुदे ती योग्यरीत्या करणे व त्या भूमिकेला न्याय देण्याचा कसब मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडे आहे. आणि असे म्हणणे काही वावगं ठरणार नाही. आपल्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारून चित्रपट हिट केले आहेत.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर भलतीच अॅक्टिव्ह असते. ती तिच्या चाहत्यांसाठी वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो शेअर करत राहते. तिच्या अभिनयाबरोबर सोनालीचे सौंदर्य व अदा तिच्या रसिकांच्या व चाहत्यांच्या मनाला भावल्या आहेत.

सोनाली कुलकर्णी तिच्या स्टाईल, लूक व फॅशनच्या बाबत नेहमीच जास्त सजग असते. आज मराठी चित्रपटसृष्टीत सोनाली कुलकर्णी हे नाव अतिशय महत्त्वाचे व मानाचे मानले जाते. तिच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ‘दिल चाहता है’ हा चित्रपट ठरला होता. खऱ्या अर्थाने तिला ‘दिल चाहता है’ या चित्रपटाद्वारे तिला ओळख मिळाली होती.

सोनालीने नुकताच तिचा करिअरच्या सुरूवातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सोनालीच्या अदा पाहून तुम्हीही फिदा झाल्याशिवाय राहणार नाही.

करिअरच्या सुरूवातीचे फोटों व आत्ताच्या फोटोंवर जर आपण नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये काळाप्रमाणे थोडाफार बदल झाला असला तरीही आजही सोनाली पूर्वीप्रमाणेच सुंदर आणि फिट दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे.

मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. आजही सोनाली फारच ग्लॅमरस दिसते.

Team Hou De Viral