ओळखलंत का या लोकप्रिय मराठी अभिनेत्याला? हा अभिनेता आहे तरुणाईमध्ये फार प्रसिद्ध

फोटोमध्ये दिसणाऱ्या या लहान मुलाला तुम्ही ओळखलंत का? हा मुलगा आता आहे मराठी इंडस्ट्रीमधला लोकप्रिय अभिनेता आणि तरुणाईमध्ये हा अभिनेता फार प्रसिद्ध झालेला आहे.
‘फास्टर फेणे’, ‘दिल दोस्ती दुनियादारी’, हे झाले चित्रपट तर ‘अमर फोटो स्टुडिओ’ यांसारख्या नाटकामधून आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या व चाहत्यांचा मनात आपली जागा निर्माण करणारा हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून तर आपला अमेय वाघ आहे. व सोशल मीडियावरही त्याची क्रेझ आपल्याला पाहायला मिळते.
अमेय वाघने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा फोटो त्याच्या चाहत्यांसाठी शेअर केला. आयुष्यात पहिल्यांदा gathering मध्ये भाग घेतला तेव्हा “बाल शिवाजी” झालो होतो आणि पहिल्यांदा tv वर काम मिळालं तेही बाल शिवाजी म्हणूनच …हे माझं भाग्य ! सगळयांना छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ! जय भवानी …. जय शिवाजी ! 🙏
अमेयच्या या फोटोला भरभरून लाइक्स व कमेंट्स मिळत आहेत.लहानपणा पासूनच अभिनयाची आवड असलेल्या अमेयने ‘दळण’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘नटसम्राट’, ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘कट्यार काळजात घुसली’ यांसारख्या नाटकांमध्ये काम केलंय.
तर ‘पोपट’, ‘फास्टर फेणे’, ‘शटर’, ‘घंटा’, ‘गर्लफ्रेंड’, ‘मुरंबा’, ‘धुरळा’सारख्या अनेक चित्रपटांत त्याने अभिनय केला आहे. याशिवाय अमेयची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ ही टीव्ही मालिकाही चांगलीच गाजली.