कधीकाळी थोड्या पैशांसाठी कापड गिरणीत काम करायचा हा अभिनेता, आज घेतो चित्रपटांसाठी करोडो रुपये !

कधीकाळी थोड्या पैशांसाठी कापड गिरणीत काम करायचा हा अभिनेता, आज घेतो चित्रपटांसाठी करोडो रुपये !

दक्षिण चित्रपटातील सुपरस्टार सूर्या लवकरच कॉमिक सुपरहीरोच्या भूमिकेत दिसणार आहे. बातमीनुसार दिग्दर्शक लोकेश कानगराजच्या आगामी चित्रपटात काम करताना दिसणार आहेत. तथापि, फार कमी लोकांना माहिती आहे की सूर्या अभिनयाच्या जगात प्रवेश करण्यापूर्वी कापड गिरणीत काम करायचा.

चित्रपटांमध्ये रस नव्हता

चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांना चित्रपटांमध्ये सहज काम सहज मिळते, परंतु त्यांना स्वतःची ओळख ही स्वतःच्या दमावर कमवावी लागते. सूर्या हा तमिळ अभिनेता शिवकुमार यांचा मुलगा आहे आणि लहानपणापासूनच चित्रपटसृष्टीशी संबंधित आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्याला चित्रपटांमध्ये रस नव्हता, म्हणून त्याने वस्त्रोद्योग गिरणीत काम करण्यास सुरवात केली. 8 महिन्यांपर्यंत त्याने गिरणीमध्ये काम केले. कामाबद्दल त्याला एक हजार रुपये मिळायचे.

ऑफर नाकारल्या

वयाच्या 20 व्या वर्षी त्याला चित्रपटात काम करण्याची ऑफर देण्यात आली होती पण त्याने ती नाकारली. पण दोन वर्षांनंतर त्याने वयाच्या 22 व्या वर्षी दिग्दर्शक वसंत यांच्या ‘नेररुक्कु नेर’ (1997) चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटाचे निर्माता मणिरत्नम होते.

टर्निंग पॉईंट

2001 मध्ये आलेला ‘नंदा’ हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या चित्रपटासाठी त्यांना तामिळनाडू राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. 2010 मध्ये त्यांने ‘रक्त चरित्र’ चित्रपटात काम केले. चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट नवोदिताचा स्क्रीन पुरस्कार मिळाला. त्यांने ‘कादले निमधी’ (1998), ‘कृष्णा’ (1999), ‘श्री’ (2002), ‘काका काका’ (2003), ‘सिंघम’ (2010), ‘निनाततू यारो’ (2014), ‘अंजान’ ( 2014), ‘कल्याणरमण’ (2015), ’24 (2016) सोबत इतर अनेक सुप्रसिद्धचित्रपटात काम केले.

अभिनेत्रीशी केला विवाह

सूर्याने सप्टेंबर 2006 मध्ये अभिनेत्री ज्योतिकाशी लग्न केले.मुलगी दीया आणि मुलगा देवा असे दोघांना दोन मुले आहेत. सूर्या आणि ज्योतिकाने जवळपास 7 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. सूर्या दक्षिण सिनेमाच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या तार्‍यांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी तो 20-25 कोटी घेतो.

Team Hou De Viral