केस पांढरे असतील तर आहारात करा ‘हा’ बदल

केस पांढरे असतील तर आहारात करा ‘हा’ बदल

आजच्या या युगात केंस पांढरे होणे म्हणजे सर्वसामान्य झालं आहे. आणि अलिकडच्या या काळात खूप कमी वयातच केस पांढरे होण्याची समस्या खूपच वाढली आहे. कमी वयात केस पांढरे होण्याच्या मागे अनेक कारणे आहेत.

यामध्ये सर्वात महत्वाचे कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी. तसेच धूम्रपान, लाइफस्टाइल, किव्हा प्रदूषण यामुळेही कमी वयातच केस पांढरे व्हायला सुरुवात होते. केस पांढरे होणे हे टाळण्यासाठी संतुलित व योग्य आहार घ्यायला हवा. चला तर मित्रांनो जाणून घेऊया या समस्येला तोंड देण्यासाठीही कोणती काळजी घ्यावी.

आपण सॉफ्ट ड्रिंक्सचे सेवन करतो आणि यामध्ये कृत्रिम रंग व गोडपणा असतो. यामुळे शरीरात चरबी साठून लठ्ठपणा येऊ शकतो. शुगरच्या अतिप्रमाणामुळे तोंडाच्या वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. तसेच केसही पांढरे होतात.

काही मिठाचे सेवन मोठ्याप्रमाणात करतात ज्यामुळे आपल्या आरोग्यावर वाईट असे परिणाम होतो. एका दिवसात २३०० मिलीग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाणे चांगले नाही. जास्त मीठ खाल्ल्याने किडनी, हाय ब्लड प्रेशर आणि केसगळती व केस पांढरे होणे या समस्या होतात.

आपण जास्त गोड असे पदार्थ व कृत्रिम रंग असलेले पदार्थ खाणे टाळा. याचे सेवन केल्याने मायग्रेन, अ‍ॅलर्जी आणि केस पांढरे होणे या समस्या होतात. तसेच साखरेचे अधिक सेवन केल्याने आरोग्यसंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ शकतात. याने केसही पांढरे होतात.

त्यामुळे मिठाई, जंक फूड, सॉफ्ट ड्रिंक्स टाळावे. जास्त साखर खाल्ल्याने शरीरात व्हिटॅमिन ई चे प्रमाण कमी होते. हे व्हिटॅमिन केसांच्या विकासासाठी गरजेचे आहे.

Team Hou De Viral