‘खजूर’ खा हे आजार पळवा !

‘खजूर’ खा हे आजार पळवा !

खजूर खाण्याचे खूप फायदे आहेत. खजूर हे अंत्यत पौष्टिक खाद्य मानले जाते. खजूर खाल्याने अनेक आजारांनाआपण दूर ठेवू शकतो. खजुरापासून आपल्या शरीराला ताकद मिळते तसेच आपल्या शरीराचा लवकर विकास होतो.

जास्त शुगर क्रेव्हिंग त्यांच्यासाठीही खजूर उत्तम पर्याय ठरू शकतो. मधुमेहाच्या रुग्णांना खजूर तसेच खारीक चांगली असतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात. यात तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मॅंगनीज, लोह, फॉस्फरस आणि कॅल्शियमची मात्रा जास्त असते.

शरीराला ऊर्जा मिळते – खजुरात व्हिटॅमिन ए, बी १, बी२, बी ३,बी ५ आणि व्हिटॅमिन सी अशी जीवन सत्व असतात. खजूर खाल्ल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच आपला थकवा दूर होतो.

पचनशक्ती चांगली राहते – सतत पो ट फुगणे तसेच अपचन होणे अशा समस्या ज्यांना आहेत, त्यांच्यासाठी खजूर खाणे खूप लाभदायी आहे. खजूरमध्ये फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया एकदम चांगली राहते. २-३ खजूर रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. आणि ते सकाळी खा. यामुळे पचनक्रिया चांगली राहते.

र क्त वाढीसाठी उपयुक्त – खचूर खाण्यामुळे आपल्या शरीराला पुरेसे लोह प्राप्त होते. ज्या मुलांना अॅनिमिया आहे त्यांच्यासाठी खजूर फायद्याचे आहेत. तुमच्या मुलाच्या छा तीत दुखत असेल खजूर खाल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.

मज्जा संस्था अधिक मजबूत – खजुरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. यामध्ये सोडियमदेखील असते. ही दोन्ही पोषक द्रव्ये मज्जा संस्था योग्यरित्या काम करण्यासाठी मदत करतात. यामुळे आपल्या मेंदूचा विकास होतो.

खजुराचा मिल्कशेक करणेही फायद्याचे ठरते. तसेच खजूर बर्फिही करु शकता. खजुरमधील बिया काढून टाका. ते मिक्सरमधून बारीक करा. सुका मेवा आणि खसखस थोडी भाजून घ्या.

एका भांड्यात तूप टाका. तूप गरम झाल्यानंतर त्यात वेलची पावडर व खजुराचे मिश्रण टाका. खसखस व सुका मेवा टाकून सर्व्ह करा. आपण बर्फि कधीही खाऊ शकतो.

Team Hou De Viral