‘गुडन्यूज’ ?, ‘आई कुठे काय करते’ मधली संजना झाली आई, विडिओ व्हायरल

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या “आई कुठे काय करते” ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. संजना ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे.
रुपाली भोसले ही अतिशय गोंडस अशी अभिनेत्री आहे. रूपाली भोसले अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट, व्हिडिओ अपलोड करत असतात. रुपाली भोसले ही स्वतः देखील सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यासारख्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते आणि चाहत्यांना ती नवनवीन अपडेट देखील देत असते.
आपले हॉट, मादक आणि गोंडस फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. तसेच छोटे शॉर्ट व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर अपलोड करत असते. हे व्हिडिओ तिचे अतिशय मजेशीर असे असतात. त्या व्हिडिओला तिचे चाहते प्रचंड लाईक करत असतात आणि तिचे फोटो देखील खूप अप्रतिम असे असतात. दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे तिचे फॅन फॉलॉवर देखील खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
रुपाली भोसले हिने या आधी “शेजारी शेजारी पक्के शेजारी” या मालिकेत काम केले होते. ही मालिका देखील गाजली होती. तसेच तिने बिग बॉस मध्ये देखील सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्ये रुपाली भोसले ही वादग्रस्त ठरली होती. यामध्ये सहभागी झालेला तिचा सहकारी पराग कानडे याच्यासोबत तिचे प्रेमप्रकरण असल्याची चर्चा त्यावेळेस होती.
बिग बॉसच्या या वादासारखीच ती तिच्या पहिल्या लग्नामुळे देखील खूप चर्चेत आली होती. रूपाली भोसलेचे पहिले लग्न हे मिलिंद शिंदे यांच्यासोबत झाले होते. मिलिंद शिंदे हा अमेरिकेत स्थायिक झाला होता. रुपाली भोसले ही देखील त्याच्यासोबत तिथे राहत होती. लग्नानंतर काही दिवसातच दोघांमध्ये भांडण झाले. त्यानंतर माझ्यावर मिलिंद याने प्रचंड अत्याचार, मारहाण केल्याचे तिने सांगितले होते.
आता रूपाली भोसले हिने एक नुकताच व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका छोट्या बाळासोबत खेळताना दिसत आहे. या बाळाला ती अतिशय चांगल्या पद्धतीने बोलताना दिसत आहे. ‘तुमचं नाव काय आहे’, असे ती विचारत आहे. तर रूपाली भोसले हिने सेटवर आलेल्या या चिमुकल्या बाळाला आपल्या जवळ घेतले आहे.
या बाळाचे नाव ‘अथांग’ असे आहे. हे बाळ नुकतेच आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर आले होते. यावेळेस रूपाली भोसले हिने या बाळाला आपल्या जवळ घेतले आणि त्याला काही वेळ खेळवले. मुलं ही देवघरची फुलं असतात, त्यांच्या मनात काही नसतं हे किती छान असतं. आयुष्य असे तिने म्हटले आहे. तर रूपाली भोसले हिच्या या वक्तव्यावर आपली काय मत आहे, आम्हाला नक्की सांगा.