गोर होण्यासाठी क्रीम वापरत आहात का, आत्ताच थांबवा तुम्ही आजारांना निमंत्रण तर देत नाहीयेत ना, वाचा

गोर होण्यासाठी क्रीम वापरत आहात का, आत्ताच थांबवा तुम्ही आजारांना निमंत्रण तर देत नाहीयेत ना, वाचा

सध्याचा काळ हा जाहीरात बाजीचा जमाना आहे. परंतु ज्याप्रकारे एखाद्या वस्तूची जाहीरात ही केली जाते तेव्हा ती तेवढीच उपयोगी आहे की नाही याची शाश्वती ते देत नाही.

परंतु आता तर सौंदर्य प्रसाधनां बाबतचे धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यातल्या त्यात लोक आजकाल त्वचेला तजेलदार व मुलायम बनवणाऱ्या क्रीममुळे त्वचेला गंभीर इजा होत असल्याचं तसेच त्यामुळे मोठ्याप्रमाणात आजार होत आहे अशी माहिती समोर आली आहे. या क्रीममध्ये मेटल मर्क्युरी म्हणजेच पाऱ्याचा वापर होत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे.

जगभरात अश्या त्वचेला मुलायम आणि तजेलदार बनवणाऱ्या स्कीन क्रीमचा सर्रास वापर हा केला जातो. दिल्लीमध्ये असणाऱ्या एका मार्केटमधून 4 नमुन्यात मर्क्युरीचे प्रमाण 48.17 ते 1 लाख 10 हजार पीपीएम एवढं आढळलं आहे.आणि हा दावा झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुपने केला आहे. मर्क्युरीमुले होणाऱ्या प्रदुषणावर हा संघ काम करतो.

ग्लोबल स्टडीमध्ये भारतासाठी टॉक्सिक लिंकने स्टडी केला.12 देशांत झालेल्या या अभ्यासात 158 स्कीन क्रीम नमुन्यातील 96 मध्ये मर्क्युरीचे प्रमाण 40 पीपीएम ते 1 लाख 30 हजार पीपीएम इतकं आहे.

भारतामध्ये घेतलेल्या नमुन्यामध्ये 40 ते 1 लाख 13 हजार पीपीएम इतकं प्रमाण आढळून आलं आहे. व हे प्रमाण मर्क्युरीच्या मर्यादीत प्रमाणापेक्षा जास्त आहे. भारतामधून घेण्यात आलेल्या ह्या नमुन्यांची चाचणी मान्यताप्राप्त लॅबमध्ये करण्यात आली. यातही जितक्या कंपन्यांचे नमुने घेतले त्यात सर्वाधिक आशियातील आहेत. पाकिस्तानमध्ये 62 टक्के, थायलंडमध्ये 19 टक्के तर चीनमध्ये 13 टक्के क्रीमचे उत्पादन होते.

त्वचा उजळवण्यासाठी अथवा त्वचेचा रंग हा गोरा करणाऱ्या स्कीन क्रीम आणि साबणामध्ये मर्क्युरीचे कॉमन इन्ग्रेडिअंट वापरले जाते. याशिवाय आय मेकअप प्रॉडक्टस यासह इतर काही सौंदर्यप्रसाधनांमध्ये मर्क्युरी वापरले जाते.

अशा प्रकारच्या क्रीमचा अतिवापर घातक आहे. मर्क्युरी असलेल्या क्रीमच्या वापराने किडनीचे विकार होतऊ शकतात. याशिवाय व्यक्तिच्या नर्व्हस सिस्टीम, पाचन शक्तीवरही परिणाम होतो. डिप्रेशन, स्कीन रॅशेसचा त्रासही होण्याची शक्यता असते.

Team Hou De Viral