जहीर खान चे सागरिकाच्या अगोदर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर प्रेम होते, लग्न करायचे होते

जहीर खान चे सागरिकाच्या अगोदर बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्रीवर प्रेम होते, लग्न करायचे होते

बॉलिवूड हसीना आणि क्रिकेटच्या खेळाडूंमधले प्रेम होणे हे प्रकरण खूप जुने आहे. बर्‍याचदा खेळाडू या हसीनांवर प्रेम करतात आणि काही वेळा त्या दोघांचे लग्न देखील होते.जसे अनुष्का शर्मा-विराट कोहली, हरभजन सिंग-गीता बसरा ही उदाहरणे आपल्यासमोर आहेत. परंतु अश्याही काही प्रेमकहाण्या आहेत ज्यांच्यात प्रचंड प्रेम असूनही त्यांचे लग्न होऊ शकले नाही. या यादीमध्ये भारताचा माजी खेळाडू जहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री ईशा शेरवानी ची प्रेमकथा देखील आहे.

सागरिका पाहिले प्रेम नाही –

युवराज सिंगप्रमाणेच झहीर खानचेही प्रेम बॉलिवूडच्या 2 अभिनेत्रींवर जडले होते. जर आपण सागरिका हे झहीरचे पहिले प्रेम आहे असे समजत असाल तर आपण चुकीचा विचार करत आहात. कारण सागरिकाच्या आधी, झहीरचे प्रेम दुसर्‍या अभिनेत्रीवर जडले होते, आणि त्या अभिनेत्री सोबत त्याचे संबंध जवळजवळ 8 वर्षे टिकले.

आपल्या सर्वांना हे माहितच आहे की झहीर खानने 2017 मध्ये ‘चक दे’ गर्ल सागरिका घाटगे यांच्याशी विवाह केला. आणि आज हे दोघेही त्यांच्या विवाहित जीवनात खूप आनंदी आहेत. पण एक वेळ अशी होती की झहीर ईशा शेरवानी च्या प्रेमात पडला होता.

ईशा शेरवानीने सुभाष घाई यांच्या ‘किसना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती, त्यानंतर ‘लक बाई चान्स’ आणि अजय देवगणच्या ‘यू मी और हम’ मध्ये दिसली होती.

प्रेमाची सुरुवात –

बातमीनुसार, इशा शेरवानी आणि झहीर खानची भेट ही 2005 मध्ये जहीर ऑस्ट्रेलिया दौर्‍यावरून परतत असताना झाली होती. टीमसाठी आयोजित कार्यक्रमात ईशाने नृत्य केले होते. तेव्हापासून त्या दोघांच्या मनात एकमेकांबद्दल भावना निर्माण झाल्या होत्या.

सामन्या दरम्यान बर्‍याच वेळा ईशा झहीरसाठी चीअर करताना दिसली होती. दोघेही 8 वर्ष एकमेकांशी संबंधात राहिले, एवढेच नाही तर ते थेट लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये देखील जगले आहेत.

अचानक ब्रेकअप –

त्यानंतर 2011 च्या विश्वचषक दरम्यान मीडियामध्ये बातमी आली की झहीर खान आणि ईशाचे लग्न होणार आहे. पण त्यानंतर अचानक झालेल्या दोघांच्या ब्रेकअपमुळे सर्वांनाच धक्का बसला. दोघांचेही एकमेकांवर खूप प्रेम होते पण हे नाते विवाह पर्यंत का पोहोचू शकले नाही हे माहित नव्हते. तथापि आजही ईशा आणि झहीर चांगले मित्र आहेत.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral