जाणून घ्या, खऱ्या आयुष्यात ‘गंगूबाई काठियावाड़ी’ नेमकी होती तरी कोण ?

जाणून घ्या, खऱ्या आयुष्यात ‘गंगूबाई काठियावाड़ी’ नेमकी होती तरी कोण ?

बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाचे पहिले मोशन पोस्टर मंगळवारी प्रसिद्ध झाले.

सोशल मीडियावरून शेअर होऊन हे मोशन पोस्टर व्हायरल झाले. या चित्रपटात आलिया भट्ट ‘गंगूबाई’ च्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे नाव वाचताच तुमच्या मनात असा विचार आलाच असेल की ही गंगूबाई नेमकी होती कोण ? तर मित्रांनो आम्ही या खास लेखात तुमच्या या प्रश्नाचे उत्तरे देऊ.

आलिया भट्ट पहिल्यांदा संजय लीला भन्साळीसोबत काम करत आहे. यापूर्वी भन्साळी आलिया भट्ट आणि सलमान खान सोबत ‘इंशा अल्लाह’ चा प्लॅन आखत होता, पण काही कारणास्तव सलमानने आपली पावले मागे घेतली, ज्यामुळे चित्रपट शांत झाला. त्यानंतर संजय लीला भन्साळी यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाची घोषणा केली.

लेखिका एस हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकानुसार गंगूबाई गुजरातमधील काठियावाड येथील रहिवासी होत्या, म्हणूनच तिला गंगूबाई काठियावाडी म्हटले जात होते.

लहान वयातच गंगूबाईंना वेश्या व्यवसायात भाग पाडले गेले. त्याच वेळी एक कुख्यात गुन्हेगार गंगूबाईचा ग्राहक झाला. गंगूबाईंनी मुंबईच्या कामठीपुरा भागात कोठा चालवित असे. त्याचवेळी गंगूबाईंनी से क्सवर्कर व अनाथांसाठी बरीच कामे केली.

गंगूबाई काठियावाडीचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. गंगूबाईंना बालपणात अभिनेत्री व्हायचं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी तिच्या वडिलांच्या लेखापालच्या प्रेमात ती पडली आणि लग्नानंतर ती मुंबईला पळून गेली. लग्नानंतर मोठी स्वप्ने पाहिलेल्या गंगूबाईंना स्वप्नांतही वाटले नसते की तिचा नवरा तिची फसवणूक करेल व तिला वेश्यागृहात फक्त पाचशे रुपयात विकेल.

हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातही माफिया डॉन करीम लाला याचा उल्लेख आहे. या पुस्तकानुसार लालाच्या टोळीतील सदस्याने गंगूबाईवर बला त्कार केला होता. त्यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाईंनी करीम लाला याची भेट घेतली आणि त्याला राखी बांधून तिने त्याला आपला भाऊ बनविले.

करीम लालाची बहीण असल्याने कामठीपुराची चावी लवकरच गंगूबाईंच्या हाती पडली. असे म्हटले जाते की गंगूबाईंनी कोणत्याही मुलीला तिच्या संमतीशिवाय तिच्या कोठेत ठेवले नाही.

आलिया भट्टच्या चित्रपटाच्या कारकिर्दीबद्दल बोलु तर ती शेवटच्यावेळी करण जोहरच्या कलंक या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट फ्लॉप ठरला, त्याआधी ती रणवीर सिंगच्या सोबत गली बॉय या चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि आलिया- रणवीरने सर्वांचे मन जिंकले.

Team Hou De Viral