‘जूनियर जी’ ची भूमिका साकारणारा तो मुलगा बघा आता कसा दिसतो, अभिनय सोडून आता त्याने इकडे मिळवली आहे लोकप्रियता

90 च्या दशकात मुलांना आवडणाऱ्या अश्या बऱ्याच सीरील्स होत्या. आणि त्या काळात मुलांचे सुपरहीरो शक्तिशान तसेच ज्युनियर जी हे होते. या भूमिका साकारणारे अभिनेते मुलांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाले होते.
ज्युनियरजी चे पात्र अमितेश कोचर नावाच्या कलाकाराने साकारले होते, जो आता बर्यापैकी मोठा झाला आहे. आता तो अभिनयापासून दूर झाला आहे, परंतु ज्युनियर जी लहान मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाला होता. परंतु इतकी मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवल्यानंतर तो मुलगा नेमका कुठे गायब झाला?
‘ज्युनियर जी’ ही’ 90 च्या दशकातील सुपरहिट सीरियल होती, परंतु इतकी लोकप्रियता मिळवल्यानंतरही हा मुलगा कुठे गायब झाला याबद्दल कोणालाच कल्पना नव्हती. लोक सोशल मीडियावरही त्याचा शोध घेत होते, परंतु त्याला मात्र कोणतीही महिती मिळत नव्हती.
बर्याच दिवसानंतर, ज्युनियर जीची भूमिका साकारणार्या अभिनेते अमितेश कोचर यांचा पत्ता मिळाला आणि तो दिसायला खूप देखणा आहे. अमितेश कोचर यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर नजर टाकली तर आता तो प्रवासी बनला आहे आणि ठिकठिकाणी फिरणे हा त्याचा छंद झाला आहे. त्याने बरेच व्लॉग आहेत ज्यात त्याने त्याचे अनुभव शेअर केले आहेत.
अमितेश हा लोकप्रिय यू ट्यूबर असून युट्यूबवर त्याचे 2 लाख फॉलोअर्स आहेत आणि तो आपल्या व्हिडिओंच्या माध्यमातून लोकांमध्ये गोष्टी शेअर करत राहतो.
अमितेश कोचरने स्वतःला ज्युनिअर म्हणून सांगितले आहे आणि त्याच्या ट्विटर अकाउंटवर त्याने एक्स ज्युनियर जी असे देखील लिहिलेले आहे आणि ट्विटरवर त्याचे अकाउंट @amiteshkochhar या नावाने आहे. अमितेशलाही कुत्री खूप आवडतात आणि त्याच्या इन्स्टाग्रामवरही त्याचे याबद्दल खूप फोटो पाहायला मिळतात.