झपाट्यानं गळत असतील केस, तर ‘या’ आजारांचा असू शकतो धोका

झपाट्यानं गळत असतील केस, तर ‘या’ आजारांचा असू शकतो धोका

सध्याच्या या घडीला केस गळती ही एक सामान्य समस्या झालेली आहे. अनेकवेळा लोकं केसगळती कडे दुर्लक्ष देखील करतात आणि जेव्हा या समस्याचे प्रमाण वाढते तेव्हा डॉक्टरांकडे जातात. केव्हा केव्हा सर्वसामान्यपणे केस गळती लोकांना फार गंभीर वाटत नाही, पण त्याचं गांभीर्य लोकांना समजायला हवं.

खरंतर केस गळती माघे बरीच कारणं आहेत. अनेकदा गंभीर समस्यांमध्ये केसगळती होऊ शकते. आणि जर केस गळती वाढली असेल तर आपण या आजारांची टेस्ट अवश्य करायला हवी. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणत्या आजारांमध्ये केसगळती ही होते.

ताण-तणाव – मानवाच्या पाठी ताण-तणाव जर असेल तर त्याचा परिणाम फक्त आपल्या मेंदू व हृदयावरच होत नाही तर आपल्या केसांवर देखील होतो. जे लोक जास्त तणावा खाली असतात किंवा ज्यांना खूप डिप्रेशन येतं, अशा लोकांचे केस झपाट्यानं गळतात.

यामागचं कारण हेच आहे की, तणाव असल्याने चांगले हार्मोन्स तयार होऊ नाही आणि याचा थेट परिणाम पचनक्रियेवर होतो. यामुळे शरीराला योग्य पोषण मिळत नाही आणि केस गळायला लागतात.

थायरॉईड असंतुलित होणं

थायरॉईडच्या असंतुलनामुळे केस झपाट्यानं गळतात. हायपर थायरॉईड किंवा हायपोथायरॉईडची समस्या असेल तर त्याचा त्वचा आणि केसांवर सर्वाधिक परिणाम होतो. जर केस गळती सोबतच झपाट्यानं वजन सुद्धा कमी होत असेल किंवा वाढत असेल तर आपल्याला थायरॉईड टेस्ट करणं आवश्यक आहे.

ब्लडप्रेशर वाढणं सुद्धा एक महत्त्वाचं कारण ठरतं

जर आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण नेहमी वाढलेलं राहत असेल तरीही केस गळतीची समस्या होते. तसंच ब्लडप्रेशन वाढल्यानं रक्तातील सोडियमचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ब्लड सर्कुलेशन डिस्टर्ब होतं आणि केसांवर याचा परिणाम होतो. यामुळे सुद्धा केस गळतीची समस्या उद्भवते.

कँसरमध्ये पण गळतात केस

कँसर एक खूप गंभीर आजार आहे. कँसर कुठलाही असो मात्र यात केसांवर त्याचा खूप परिणाम होतो. जर आपल्याला केस गळतीचं कारण समजत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.या संभाव्य आजारांमध्ये केस मोठ्या प्रमाणात गळतात, म्हणून केस गळतीकडे गंभीरपणे बघितलं पाहिजे.

टीप :- वरील लेखामध्ये दिलेली माहिती ही सामान्य माहिती आहे. याचा उपयोग करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Team Hou De Viral