झोप येत नाही, भूक लागत नाही, मग नियमित खा ‘ही’ भाजी

झोप येत नाही, भूक लागत नाही, मग नियमित खा ‘ही’ भाजी

भरलं वांगे, वांग्याची भरीत ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं ना. असंच चमचमीत भरलं वांग किव्हा वांग्याची भरीत समोर दिसले की आपण त्यावर जणू काही तुटून पडतो. असं चवीला चवदार असणार हे वांगे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.

भरपूर लोकांना भूक लागत नाही किव्हा झोप येत नाही अशा लोकांनी दणकून वांग्याचं सेवन सुरू करावे. या बरोबरच वांग्याचे बरेच फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

आरोग्यदायी वांग्याचे फायदे – वांगे हे अग्निदीपक असल्याने अन्न पचन चांगले होते व भूक लागते. कोवळे डोरली वांगे विस्तवावर भाजून घ्यावं. जळलेली साल काढून टाकून द्या. आता वांग्यात मिरचीपूड आणि चवीपुरते सैंधव घालून खा.

पोट फुगून हृदयावर दाब पडतो आहे, काहीवेळा असे वाटत असल्यासदेखील वरीलप्रमाणे वांग्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पोटफुगणे कमी होऊन हृदयावर पडणारा दाब हा कमी होतो.

वांगे हे निद्राकारा म्हणजे झोप लावणारे आहे. अश्याप्रकारे वांग्याचे भरीत खाऊन झोपल्यास झोप चांगली लागते. शिवाय वांग्याची पानंही झोपेसाठी उपयुक्त आहेत.वांग्याची पाने ठेचून त्याचा चमचाभर रस (१० ग्रॅम) घेऊन त्यात वाटीभर दूध (५० ग्रॅम) आणि खडीसाखर टाकून प्या. झोप चांगली लागेल.

अशक्तपणा वाटत असल्यास कोवळ्या वांग्याची भाजी खावी. वांगे शुक्रकर आहे. तेव्हा नियमित खाल्ल्यास थोड्याच दिवसात शक्ती वाढेल.मूळव्याध असल्यास पांढऱ्या वांग्याची भाजी करून खावी किंवा गाठींवर वांगं भाजून लावावं.

ताप आल्यास वांग्याचं भरीत आणि मऊ भात खावा, ताप कमी होण्यास मदत होते. कोवळं वांगं कफावरही फायदेशीर आहे, त्यामुळे कफ झाल्यास त्याची भाजी खावी. तोंडाला चव नसेल तर वांगं वाफवून त्यात सैंधव आणि आलं घालून भाजी करावी.

सूचना- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.in याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Team Hou De Viral