डोळ्याखालील ‘काळे डाग’ नाहीसे करायचे आहेत? मग करा ‘सोप्पे’ उपाय

आपण सर्वजण आपल्या चेहऱ्याची सर्वात जास्त प्रमाणात काळजी घेत असतो. आपल्या चेहऱ्यावरील त्वचा ही अत्यंत नाजूक असते. आणि त्यापेक्षाही अधिक नाजूक व पातळ त्वचा ही डोळ्यांच्या भोवतालची असते. त्यामुळे या त्वचेवर लवकर परिणाम होतो.
अल्पशी झोप घेणे, जास्त वेळ संगणक-मोबाईलवर वर घालवणे, शारिरीक कमजोरी, थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळे घेरे तयार होतात. या समस्येचा बहुतेकजणांना त्रास होत असून त्यांच्या चेहऱ्यावरील आकर्षकपणा नाहीसा होतो. हे काळे डाग नाहीसे करण्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घ्या…
अश्याप्रकारे काळजी घ्या – दररोज तुम्ही कमीत कमी आठ तास तरी झोप घ्यायला हवी.परंतु गरजेपेक्षाही जास्त वेळ झोपल्याने काळे घेरे पडतात. प्रमाणापेक्षा जास्त आणि अगदी कमी उजेडात काम करू नका. तसेच लगवेळ संगणकावर देखील काम करु नका. डोळ्यांची त्वचा खूप नाजूक असते, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. काळ्या घेऱ्यांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज डोळ्यांखाली हलक्या हाताने मसाज करावा.
डोळ्यांच्या भोवताली जास्त मेकअप करु नये. यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो. झोपायच्या अगोदर मेकअप काढून टाकावा आणि चेहरा व्यवस्थित धुवावा.
जास्त तेलकट आणि मसालेदार जेवण टाळावे. तसेच दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.
डाग कमी करण्यासाठी अश्याप्रकारे करा उपाय – एक चमचा गुलाब जल आणि काकडीच्या रसाचे मिश्रण करावे. कापसाने डोळ्यांखाली लावावे.अर्धा चमचा काकडीचा रस, दोन थेंब मध, बटाट्याचा रस आणि बदामाचे तल व्यवस्थित मिसळून घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण डोळ्यांखाली लावल्याने फरक पडतो.
किसलेला बटाट्याने डोळ्यांखाली हल्क्या हाताने मसाज करावी. नियमित असे केल्यास समस्या दूर होईल. कच्चे दूध आणि हळदीचे मिश्रण तयार करा आणि त्यामध्ये थोडा मध मिसळून पेस्ट बनवा. रात्री झोपण्यापूर्वी काळ्या डागांवर हे मिश्रण लावा. सकाळी चेहरा धुवा. काही दिवसांतच डाग नाहीसे होतील.
बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करुन लावावी. मध आणि बदामतेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाच नक्कीच फायदा होतो.
टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. Houdeviral.In याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.