तब्बूची मोठी बहीण आणि 90 च्या दशकातील ही हिट अभिनेत्री जगत आहे आज निनावीपणे !

तब्बूची मोठी बहीण आणि 90 च्या दशकातील ही हिट अभिनेत्री जगत आहे आज निनावीपणे !

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या काळात उत्तम असे यश मिळविले, परंतु असे असूनही ते आज फिल्मी जगापासून दूर शांत जीवन जगत आहेत. आज आम्ही तुम्हाला अश्याच एका अभिनेत्रीची ओळख करून देणार आहोत, जिचे नाव फराह नाज आहे.

90 च्या दशकात फराह एक बॉलिवूडची हिट हिरोईन होती. याशिवाय फरहा नाज ही तब्बू ची मोठी बहीण आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे. शाहिद कपूरच्या शिखर या चित्रपटात फरहा शेवटच्या वेळी दिसली होती.

ज्यानंतर फरहा चित्रपट जगतापासून पूर्णपणे दूर आहे. अलीकडे, तब्बूचा वाढदिवस होता, तेव्हा फराह ने तिची धाकटी बहीण तब्बूचा आणि तिचा फोटो सोशल मीडियावर टाकला.

फराह नाजने जवळजवळ 20 वर्षे बॉलिवूडमध्ये काम केले. ‘फासले’ चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई केली नसली तरी फराहच्या कामाचे सर्वत्र कौतुक झाले होते. आणि त्यांनतर फराहने ‘घर घर की कहानी’, ‘नसीब अपना अपना’, ‘मरते दम तक’, ‘इमानदार’, ‘बाप नंबरी दस नंबरी’, ‘मुकाबला’ यासारख्या बर्‍याच मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले.

जेव्हा फराह तिच्या कारकीर्दीच्या उंचीवर होती तेव्हा तिने दारा सिंगचा मुलगा बिंदू दारा सिंगशी लग्न केले. पण या दोघांचा विवाह फार काळ टिकू शकला नाही, आणि दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर फराहने 2003 मध्ये टीव्ही अभिनेता सुमित सहगलशी लग्न केले. सध्या ती सुमितसोबत आपले सुखी जीवन व्यतीत करत आहे.

Team Hou De Viral