तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या आणि हृदय निरोगी ठेवा

रोज सकाळ- संध्याकाळ तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते ज्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. तांब्यात अँटी ऑक्सीडेंट्स आढळतात, ज्याने वय कमी दिसतं आणि हे पाणी कर्करोगावर मात करण्यातही मदत करतं.
रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी पिण्याने त्वचेसंबंधी समस्या दूर होते आणि त्वचा उजळ दिसते. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याने यात आढळणारे कॉपर रक्ताची कमी दूर करतं. याने अशक्तपणा दूर होतो.
तांब्यात अँटी बॅक्टीरियल तत्त्व असतात, ज्याने जखम लवकर भरते. जखम झाली असल्यास रोज तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यात 8 ते 10 तास ठेवलेलं पाणी पिण्याने कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित राहतं आणि हृदय निरोगी राहतं.
अँटी बॅक्टीरियल असल्यामुळे हे पाणी पिण्याने लूज मोशन, कावीळ आणि अतिसाराचा धोका टळतो. रोज सकाळ- संध्याकाळ तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याने सांधेदुखीत आराम मिळतो.
तांब्यात आढळणार्या कॉपरने थायरॉक्सिन हॉर्मोन संतुलित राहतं आणि थायरॉईडचा धोका टळतो. कमीत कमी 8 तास तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याने अॅसिडिटी आणि गॅस दूर होते. पचन क्रिया सुरळीत होते.