‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

‘तान्हाजी’च्या या तीन स्टार्सच्या मानधनाचा आकडा वाचून व्हाल थक्क

अजय देवगण, काजोल आणि सैफ अली खान आणि इतर अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाच्या जोरावर ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा सध्या पूर्ण देशातल्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे.

तान्हाजी चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसांमध्ये 50 कोटींचा आकडा पार केलाय. या नवीन वर्षात हा पहिला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरेल या दिशेने या सिनेमाची वाटचाल सुरु आहे.

अजय देवगण आणि काजोल बरोबरच सैफ अली खान याचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका आहे. पण या मुख्य कलाकारांनी चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी किती फी घेतली आहे ते ?

सैफ अली खान – सध्या सैफ चित्रपट असेल किंवा वेबसीरिज यांत वेगवेगळ्या दमदार अभिनय सादर करत आहे. तान्हाजी- द अनसंग वॉरियर त्याचे एक उत्तम उदाहरण आहे. या चित्रपटात सैफ नकारात्मक भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी सैफने सुमारे 7 कोटींची भलीमोठी फी घेतली आहे.

काजोल- अजय आणि काजोल हे जोडपे तान्हाजी या सिनेमाच्या निमित्ताने 11 वर्षाच्या मोठ्या कालांतराने चित्रपटात एकत्र आले आहेत. काजोलने या चित्रपटात सुभेदार तान्हाजीच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी तिने 5 कोटी इतके मानधन घेतले.

अजय देवगण – अजय देवगणने या चित्रपटात सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अजय देवगणने एवढा भारी अभिनय केला आहे की, त्याचे कौतुक करताना लोक कमीच करत नाहीयेत.

तान्हाजीच्या भूमिकेसाठी अजयने प्रचंड मेहनत घेतली. तितकीच घसघशीत फी सुद्धा घेतली. होय, अजयला या सिनेमासाठी 30 कोटी इतकी भरमसाठ फी मिळाली.

Team Hou De Viral