‘तुनिषा शर्मा चा शेवटचा विडिओ, अनेकांना डोळ्यांत अश्रू…

काही दिवसापूर्वी मनोरंजन विश्वाला एक मोठा धक्का बसला. निवेदित कलाकार तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्याची ही बातमी होती. या प्रकरणी तिचा बॉयफ्रेंड शिझान खान याला अटक देखील करण्यात आली आहे. आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
पोलिसांच्या चौकशीत शिझान खान याने सांगितले की, श्रद्धा वालकर प्रकरणाप्रमाणे आपले प्रकरण होऊ नये. त्यामुळेच मी तुनिषाच्या सोबत ब्रेकअप केले होते. त्यामुळे तिने आत्महत्या केली. तुनिषा हिला शिझान याच्यासोबत लग्न करायचे होते. मात्र, शिझान याचा विरोध होता. या कारणामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.
आता सोशल मीडियावर तिच्या अंत्यविधीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायला होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती अतिशय शांतपणे चीरनिद्रित पडलेली दिसत आहे. तिच्या चेहऱ्याकडे पाहून अनेक जण रडताना देखील दिसत आहेत. तिच्या नातेवाईकांनी तिला अतिशय कष्टदायकरित्या निरोप दिला.
अवघ्या विसाव्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. त्यामुळे अनेक जण खूप हळहळले. अनेक जण तर तिचा हा व्हिडिओ पाहूनच रडायला लागले होते. एकूणच काय तर त्या शिझान खान याला मोठी शिक्षा द्या, अशी मागणी देखील आता अनेकजण करताना दिसत आहेत. एका अभिनेत्रीचे करियर संपवले, असे देखील अनेक जण म्हणताना दिसत आहेत. तुनिषा ही त्याच्या बाबतीत अतिशय हळवी होती.
त्यामुळे त्याने तिला दुखायला पाहिजे नव्हते, असेही अनेक जण म्हणताना दिसत आहेत. तर या प्रकरणावर आपले काय मत आहे आम्हाला नक्की सांगा.