तुम्हालाही पायांवर आढी मारून बसण्याची सवय आहे का? होऊ शकता आजारी

बऱ्याच लोकांना पायांवर आढी मारून बसण्याची सवय असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का असे करणे बऱ्याच शारीरिक समस्यांना कारणीभूत ठरू शकते. तुम्हालाही अशीच सवय असेल तर आजच ती बंद करा, नाहीतर तुम्हाला त्याचे शरीराला वाईट परिणाम भोगावे लागतील.
रक्ताचे परिवहन चांगले होत नाही:
अश्याप्रकारे क्रॉस पाय करून बसल्यामुळे रक्ताचे परिसंचरण हे चांगले होत नाही, आणि त्यामुळे आपण जेव्हा एका पायावर दुसरा पाय ठेवता तेव्हा दोन्ही पायांमध्ये रक्त परिसंचरण एकसारखे होत नाही. यामुळे पाय सुन्न होतात किंवा पायाला मुंग्या येतात.
संधिवात जडू शकतो :
बऱ्याच वेळी कार्यालयता लोक खुर्चीवर दररोज ८ ते ९ तास क्रॉस बसण्यामुळे सांध्यामध्ये वेदना होऊ शकतात. आणि हे टाळण्यासाठी थोडा वेळ आपल्या बसण्याची स्थिती बदलत राहावी, असे केल्याने शरीरात हालचालही राहते आणि थकवादेखील जाणवत नाही. त्यामुळे ऑफिस असो की घर असे बसणे टाळावे.
बीपीचा त्रास होऊ शकतो :
बऱ्याच आरोग्य अभ्यासामध्ये आढळले की, एका पायावर आढी मारून बसल्यामुळे नसांवर दबाव पडतो. त्यामुळे रक्तदाब वाढतो. म्हणून, बीपी असलेल्या रुग्णांनी असे बसणे टाळले पाहिजे. त्यांनी आसनाची काळजी घ्यावी.