तुम्हीसुद्धा फेशियल करता का ? मग जाणून घ्या त्याचे साईड इफेक्ट्स

तुम्हीसुद्धा फेशियल करता का ? मग जाणून घ्या त्याचे साईड इफेक्ट्स

सुंदर व आकर्षक दिसायला सगळ्यांनाच आवडते. त्यातही महिला सौंदर्याच्या बाबतीत अधिक जागृक असतात. यामुळे चेहरा सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी त्या ब्लिच आणि फेशियल करतात.

पण तुम्हांला हे वाचून धक्का बसेल कि चेहरा सुंदर दिसण्यासाठी करण्यात येणाऱ्या या फेशियलचे साईड इफेक्ट्सही आहेत. ज्यामुळे तुमचा चेहरा कायमचा विद्रुप होऊ शकतो असे तज्त्रांनी म्हटले आहे.

फेशियल करताना अनेक रसायने असलेले क्रिम चेहऱ्यावर लावण्यात येते. या क्रिमचा वापर करुन चेहऱ्यावर १५ ते २० मिनिट मसाज केला जातो. ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील रंध्रे मोकळी होऊन रक्ताभिसरण व्यवस्थित होते. परिणामी चेहरा ताजा व टवटवीत दिसतो.

पण बऱ्याचवेळा मसाजसाठी वापरण्यात येणाऱ्या क्रिममधील रसायने त्वचेला सूट होत नाहीत. त्यामुळे त्वचेला खाज येणे, लाल चट्टे पडणे यासरखे दुष्परिणाम त्वेचवर होतात. चेहरा खराब होतो.

फेशियल करतेवेळी चेहऱ्यावर स्क्रब लावण्यात येते. हे स्क्रब खडबडीत असल्याने चेहऱ्याच्या त्वचेवर जखम होऊ शकते. सुरुवातीला सौम्य दिसणाऱ्या या जखम नंतर पसरल्याने इन्फेक्शन होते. चेहऱ्यावर पुटकुळ्या येतात.

तर काहीजणांना रसायनांची एलर्जी असल्याने चेहरा अधिकच खराब होतो. त्वचेवर डाग पडतात. जे कधी कायमचे असतात. यामुळे फेशियल करण्याआधी तज्त्रांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Team Hou De Viral