तुम्ही जर हिवाळ्यात आल्याचं सेवन करत असाल तर सावधान.

थंडीच्या या दिवसात सर्वानाच गरमागरम खायची किव्हा प्यायची इच्छा होत असते. आणि यातला मुख्य पेय म्हणजे चहा. ऋतू कोणताही असो आपल्याला चहा आल्याचाच हवा असतो.
हिवाळ्यात आपल्याला गरम वाटावं म्हणून आपण सारखा सारखा चहा पितो. आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही आल्याचा चहा पित असाल तर तो चहा तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरच आहे. जरी असे असले तरी आल्याचे जास्त प्रमाणात सेवन हे आपल्याला महागात पडू शकतं. तुमचा यावर विश्वास बसणार नाही परंतु हेच खरे आहे. चला तर मग जाणून घेऊया आल्याचे सेवन केल्यामुळे आपल्या आरोग्याला कसे नुकसान होते.
आलं हे रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करते. परंतु तुम्हाला जर कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर आल्यांच जास्त सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
आल्याचं सेवनाने आपले पोट साफ राहते. कारण आल्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म अन्न पचणास मदत करतात. पण जर आल्याचं सेवन जास्त करत असाल तर या स्थितीत पोट बिघडून जुलाब होण्याची शक्यता असते.
आल्यामुळे गॅस आणि पोटदुखीची समस्या दूर होते. पण त्यासाठी याचा वापर फक्त चहातच करावा. जेवणात जास्त समावेश करू नये. कारण त्यामुळे समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
जर तुम्ही भाज्या बनवताना मसाल्यात किंवा फोडणीत आल्याचा चवीसाठी जास्त वापर करत असाल तर यामुळे पदार्थाला चांगली चव येईल पण त्यामुळे एसिडिटी होण्याची शक्यता अधिक असते. अनेकांना मसालेदार पदार्थ खाल्ल्यांमुळे वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्याचं कारण आल्याचा केलेला अतिवापर हे असू शकतं.
आल्याचा आहारात समावेश केल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. तसंच आल्याचं जास्त सेवन केल्यामुळे ही प्रकिया अधिक जलदगतीने झाल्यास आरोग्याला धोका उद्भवू शकतो.