तुम्ही वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे फोटो पाहिलेत का?

तुम्ही वर्षा उसगांवकर यांच्या पतीचे फोटो पाहिलेत का?

आपल्याला जो कलाकार आवडतो त्याच्याबद्दल कोणतीही माहिती जाणून घ्यायची आपली इच्छा नेहमीच असते.आणि त्यासाठी आपण त्यांना सोशल मीडियावर कलाकारांना फॉलो करतो. पण काही कलाकार सोशल मीडियावर तितकेसे अ‍ॅक्टिव्ह नसल्याने त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी, कुटुंबाबाबत आपल्याला खूपच कमी माहिती असते. चला तर मित्रांनो तुम्हाला आम्ही आज अशाच एका प्रसिद्ध अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत.

मराठीसोबत हिंदी व राजस्थानी चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाने नव्वदचं दशक गाजवणारी अभिनेत्री म्हणजे वर्षा उसगांवकर. अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी विविध भूमिका गाजवल्या. मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या.

वर्षा उसगावकर यांची गणना मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये केली जात असे. आजही त्यांची प्रचंड अशी फॅन फॉलोव्हिंग आहे आणि त्यांच्या बद्दल जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच इच्छा असते. वर्षा उसगांवकर आज चित्रपटात खूपच कमी काम करत असल्या तरी त्या अनेक समारंभात, पार्टींमध्ये, पुरस्कार सोहळ्यात आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी माघे काही दिवसांपूर्वी एका कोंकणी चित्रपटात आणि पियानो फॉर सेल या नाटकामध्ये काम केले होते.

वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत लग्न केले असून वर्षाचे पती अनेकवेळा तिच्यासोबत फिल्मी समारंभात दिसतात. त्या दोघांच्या लग्नाला जवळजवळ 19 वर्षं झाले आहेत. अजय यांचे कुटुंब संगीत क्षेत्राशी संबंधित आहे तर वर्षा यांचे वडील प्रसिद्ध राजकारणी होते.

मराठी इंडस्ट्रीत १९८०-१९९० या कालावधीत आपल्या सुंदर अदाकारीमुळे प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या अभिनेत्रींमध्ये एव्हरग्रीन अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे नाव आग्रहाने घेतले जाते. दिग्गज कलाकार अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नितीन भारद्वाज यांच्यासोबत त्या अनेक चित्रपटात झळकल्या होत्या.

गंमत जंमत, खट्याळ सासू नाठाळ सून, सगळीकडे बोंबाबोंब, मज्जाच मज्जा, हमाल दे धमाल, कुठं कुठं शोधू मी तिला, भुताचा भाऊ, पसंत आहे मुलगी, आमच्या सारखे आम्हीच, शेजारी शेजारी, पटली रे पटली, घनचक्कर, मुंबई ते मॉरिशस, ऐकावं ते नवलच, एक होता विदूषक असे अनेक त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत.

Team Hou De Viral