तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिला किसिंग सीन, पाहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

तेजश्री प्रधानने पहिल्याच हिंदी चित्रपटात दिला किसिंग सीन, पाहा बबलू बॅचलरचा ट्रेलर

तेजश्री प्रधान एक अशी अभिनेत्री आहे जिने छोटा पडदा असो किव्हा रुपेरी पडदा दोन्हीकडे तिच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकलेली आहेत. तसेच छोट्या व मोठ्या पडद्यानंतर तिने हिंदी व मराठी रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप तेजश्रीने सोडलेली आहे.

तेजश्रीवर हिंदी असो किंवा मराठी प्रेक्षक तिच्या उत्तम अभिनय कौशल्यावर प्रेम करत आहेत. आता तेजश्रीने बॉलिवूडमध्ये एंट्री घेतलेली आहे व ती लवकरच बबलू बॅचलर या बॉलिवूड चित्रपटात शर्मन जोशीसोबत आपल्याला दिसणार आहे.

बबलू बॅचलर या चित्रपटाचे पोस्टर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत तिने तिच्या पहिल्या हिंदी चित्रपटाबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.तेजश्री व शर्मन जोशी याअगोदर एका नाटकात एकत्र काम केले आहे. या नाटकाला रसिकांची भरभरून दाद दिली होती. त्यामुळे आता मोठ्या पडद्यावर त्या दोघांची केमिस्ट्री बघण्यासाठी प्रेक्षकवर्ग उत्सुकलेला आहे.

20 मार्चला ‘बबलू बॅचलर’ हा चित्रपट लोकांच्या भेटीला येत आहे.’बबलू बॅचलर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या ट्रेलरमध्ये आपल्याला चक्क तेजश्री प्रधान आणि शर्मन जोशी यांचा किसिंग सीन पाहायला मिळत आहे.

तिच्या पहिल्याच हिंदी चित्रपटात तेजश्रीने किसिंग सीन दिल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा चांगलीच रंगली आहे. तेजश्रीने होणार सून मी या घरची या मालिकेनंतर चित्रपटात आणि नाटकात काम केलं. त्यामुळे छोट्या पडद्याला काही काळासाठी तिने रामराम ठोकला होता.

पण आता ती प्रेक्षकांना ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे. तिच्या या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळतेय.

आमचे पेज लाईक करा.

Team Hou De Viral