थंडीत गरम पाण्याने अंघोळ केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान? जाणून घ्या काय आहे सत्य

हिवाळा हा ऋतू सुरु झाला की आपण गरम पाण्याने तोंड धुणे, गरम पाण्यानं अंघोळ करणे, गरमागरम पदार्थ खाणे याला सुरुवात करतो. परंतु बऱ्याचवेळा आपल्याला गरम पाण्यानं अंघोळ केल्यानंतर आपला थकवा दूर झालाय असे वाटते.
परंतु मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, गरम पाण्याने अंघोळ केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? जरी गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर तुम्हाला थकवा दूर झाला असेल असं वाटत असेल तरीही त्यापासून होणारं नुकसानही मोठं आहे.
चला तर मित्रांनो जाणून घेऊन हिवाळ्यामध्ये गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर आपल्या शरीराच काय काय नुकसान होऊ शकतं.
1. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपली त्वचा ही कोरडी जाते आणि त्वचेचा मुलायमपणा कमी होतो. ज्या लोकांची त्वचा ही संवेदनशील आहे अशा लोकांनी तर कोमट किव्हा थंड पाण्याने मस्तपैकी अंघोळ करावी. अंघोळीसाठी कडक गरम पाण्याचा वापर करू नये.
2. गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरामधील इम्युनिटी, मॉइश्चरायझर याचे प्रमाण कमी होत जाते. आपल्या शरीरातल्या नॅचरल ऑइलचा लवकर संपण्याचा धोका असतो. त्यामुळे सुरकुत्या येऊ शकतात आणि चेहऱ्याची चमक दूर होऊ शकते.
3. एका रिसर्चमध्ये अशी माहीती समोर आली आहे की गरम पाण्याने अंघोळ केली असता पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.
4. कडक गरम पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्याला सुस्ती येते. सतत झोप लागते. लहान मुलांना गरम पाण्यानं अंघोळ घातली की ती एवढी चांगली झोप घेतात ते उगाचच नाही. गरम पाण्याने अंघोळ केल्यावर झोप शांत लागते असं सांगितलं जातं. तर थंड पाण्याने अंघोळ केली तर आळस आणि झोप दोन्ही निघून जातात आणि ऊर्जा येते. संपूर्ण दिवस उत्साहात जातो.
5. जास्त गरम पाण्याने अंघोळ केली तर त्वचेवरील स्फोअर ओपन होतात. त्वचा नाजूक होते. त्यामुळे इन्फेक्शन आणि अॅलर्जी होण्याचा धोका वाढतो.
6. जास्त गरम पाण्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. डोळ्यांना खाज येणं, आणि इन्फेक्शन होण्याचा धोका जास्त असतो.