दुःखदायक ! या प्रसिद्ध अभिनेत्याला आला हृदयविकाराचा झटका, प्रकृती अतिशय गंभीर ?

बॉलीवूडमध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक कलाकार आजारी पडत आहेत. किंवा काही कलाकार हे आपल्याला सोडून देखील जात आहेत, अशा बातम्या आपण खूप पाहिलेल्या आहेत. काही दिवसापूर्वी बॉलीवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री तबसूम यांचे वर्धापकाळाने निधन झाले होते. त्यानंतरही बॉलीवूडमध्ये अनेक धक्के बसलेले आहेत.
अनेक कलाकार सोडून गेल्याचे पाहायला मिळाले. काही महिन्यांमध्ये आपल्याला प्रसिद्ध गायक के के हे देखील सोडून गेले. केके यांचा मृत्यू बॉलीवूडला हा पचनी पडला नाही. त्याचप्रमाणे विनोदवीर राजू श्रीवास्तव हे देखील सोडून गेलेले आहेत. तर काही कलाकारांच्या प्रकृती या गेल्या काही दिवसांमध्ये ढासळली आहे, असे दिसत आहे.
बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता असलेला राहुल रॉय याला चित्रीकरण दरम्यानच हृदय विकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यानंतर त्याची प्रकृती ही खूप सुधारली होती, असे देखील सांगण्यात येते. याप्रमाणे काही अभिनेत्यांना शुगर लेवल वाढली, तर काही जणांना इतर आजारांमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहेत.
काही दिवसापूर्वी बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता संजय दत्त याला देखील रुटीन चेकअप साठी रुग्णालयात नेण्यात आले होते. आता देखील बॉलीवूडमध्ये चित्रपट निर्मितीत दबदबा असलेले ज्येष्ठ निर्माते नितीन मनमोहन यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खूपच ढासाळी असल्याचे सांगण्यात येते. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
त्यानंतर त्यांना तातडीने दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नितीन मनमोहन हे बॉलीवूडचे प्रसिद्ध असे दिग्दर्शक निर्माते व अभिनेते देखील आहेत. त्यांचे वडील देखील या क्षेत्रातच कार्यरत होते. आता त्यांची प्रकृती बरी व्हावी यासाठी अनेकजण प्रार्थना करत आहेत.नितीन मनमोहन हे बॉलीवूडचे लोकप्रिय अभिनेते मनमोहन यांचे चिरंजीव आहेत.
नितीन मनमोहन यांनी आजवर अनेक चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. बोल राधा बोल, लाडला, चल मेरे भाई, रेडी, पृथ्व धग यासारख्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ते उत्तम अभिनेते देखील आहेत. नितीन मनमोहन यांनी दूरदर्शन मालिकेमध्ये चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती. आता त्यांच्या अशा दवाखान्यात जाण्याने त्यांचे चाहते फारच हादरले आहेत.