दुपारच जेवण झाल्यानंतर झोप घेताय? त्याचे परिणाम पाहून व्हाल थक्क!

दुपारच जेवण झाल्यानंतर सर्वांनाच मस्त झोप येते असे बऱ्याच लोकांचे म्हणणे आहे. दुपारसाज जेवण झाल्यानंतर घेतलेली झोप जणू काय स्वर्गसुखच!
दुपारचे जेवण झाल्यानंतर येणारी झोप अनेकजण रोखू शकत नाही. दुपारी जेवणानंतर खूप छान झोप येते असे अनेकांचे म्हणणे असते. पण या झोपेचे काय परिणाम आहेत..हे जर का तुम्हाला समजले. तर तुमची झोपच उडेल. कारण दुपारची जेवणानंतरची झोप शरीरासाठी वाईट असते. शरिराला अनेक तोटे असतात त्यातलेच काही आपण बघूया…
दुपारी झोपण्याचे हे आहेत तोटे
बऱ्याच लोकांना दुपारी झोपण्याची सवय असते, दुपारी जेवण झाल्यावर झोपणे अपायकारक असते. दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाला अडचणी निर्माण होतात. याबरोबर शरीरात मेदाचा देखील संचय वाढत जातो. यासाठी दुपारची झोप टाळलेलीच बरी.
शरीरात चरबी वाढते – दुपारी झोपल्यामुळे शरिरात मेदाचे म्हणजेच फॅट्सचे प्रमाण वाढत असते. दुपारी झोपेच्या अधिक प्रमाणामुळे आपले वजन वाढू लागतं, आणि वजन वाढल्याने अनेक आजार बळावतात.
कफदोष वाढतो – दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.
मधुमेहाचा धोका वाढतो – दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुऴे मोठ्या प्रमाणात मधूमेह होण्याची शक्यता वाढतात.
त्वचा रोगाचा धोका – अनेक वेळेस रक्त दूषित होण्याचे कारण हे दुपारची झोप हेही असू शकते. कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. त्यासोबतच यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शितपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.