धवनने 2 मुलांची आई अन 7 वर्ष मोठी असणाऱ्या माहिलेसोबत का लग्न केले, जाणून घ्या त्यामागील कारण !

प्रेम ही एक अशी सुंदर भावना असते आणि जी कोणालाही होऊ शकते. त्यासाठी ना वयाची कोणतीही मर्यादा नाही ना जन्माचे बंधन, आजच्या काळात प्रेम कोणाबरोबरही सहज होते.
पण आज आम्ही बोलत आहोत भारतीय क्रिकेट संघाचा झंझावाती फलंदाज शिखर धवनबद्दल, ज्याचे हृदय त्याच्यापेक्षा 7 वर्षांनी मोठी असलेल्या एका स्त्रीवर आले. इतकेच नाही तर त्या महिलेचा घटस्फोटही झालेला आहे व तिला दोन मुले देखील आहेत.
प्रेम खरंच असे असते का ? ज्यामध्ये समोरच्याला त्याच्या भावी जोडीदारामध्ये प्रेमापुढे काहीही दिसत नाही? शिखर धवन हा क्रिकेट जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे पण वैयक्तिक आयुष्यात त्याने मोठे काम केले आहे, त्यामागचे कारण जाणून घेतल्यास तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल.
धवनने 2 मुलांच्या आईसह आणि 7 वर्ष मोठी असलेल्या महिलेशी लग्न का केले, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत.
धवनने का 2 मुलांची आई आणि 7 वर्ष मोठया असणाऱ्या महिलेशी लग्न केले ? – आजच्या मुलांना अशा मुली आवडतात ज्यांचा कोणी प्रियकर नसतो, पण या उलट शिखर धवनने अशी मुलगी आवडली जी आधीपासूनच विवाहित होती आणि ती दोन मुलांची आई देखील होती. एवढेच नव्हे तर शिखरने त्या महिलेशी लग्नही केले.
शिखरने बालपणापासूनच ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय वंशाच्या आयशा मुखर्जीशी लग्न केले. आयशाचे वडील बंगाली आणि आई ऑस्ट्रेलियन आहे, पण आयशाचा जन्म भारतात झाला आणि जेव्हा आयशा लहान होती, तेव्हा ती आपल्या पालकांसह ऑस्ट्रेलियामध्ये राहू लागली. आयशा मुखर्जी लहानपणापासूनच सर्व प्रकारच्या खेळांमध्ये अव्वल राहिल्या आहेत, तिने रिंग बॉक्सिंग, टेनिस आणि क्रिकेट असे अनेक खेळ खेळले आहेत.
आयशाला क्रिकेट आवडते आणि ह्याच आवडीमुळे तिची ओळख शिखरशी झाली. आयशा आणि शिखर फेसबुकवर मित्र बनले, त्यानंतर त्यांची भेट झाली आणि प्रेमकथा सुरू झाली. फेसबुक वर आयशा हरभजन सिंग ही म्युच्युअल फ्रेंड होती आणि ती दोघांनाही भेटली होती.
हळू हळू धवन आणि आयशाने फेसबुकवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली, यानंतर त्यांचे प्रेम सुरू झाले आणि चर्चा वाढू लागली. त्यावेळी आयशाचा घटस्फोट झाला होता आणि ती दोन मुलांची आई होती, व तिने शिखर याबद्दल सांगितले आणि शिखरने तिला सांगितले की त्याला यात काही अडचण नाही.
आयशा प्रशिक्षकापेक्षा काही कमी नाही – 32 वर्षीय शिखर धवनने समजूतदारपणा दाखविला आणि 2012 मध्ये आयशाशी लग्न केले. आयशाच्या प्रेमाने शिखर एक जबाबदार माणूस बनला. त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलले जेव्हा आयशाने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला आणि आयशाने त्याला खूप काही शिकवले, असे धवन स्वतः धवन सांगतो.
शिखरने सांगितले की जेव्हा तो क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यास असमर्थ असेल तेव्हा त्यांला प्रशिक्षकापेक्षा त्याच्या पत्नीची जास्त भीती वाटते, आयशा आधी त्याला फटकारते आणि नंतर चांगल्या खेळासाठी काय करावे हे सांगते.