‘नाळ’ मध्ये दिसलेला हा चिमुरडा सध्या काय करतोय ? जाणून घ्या याबद्दल

‘नाळ’ मध्ये दिसलेला हा चिमुरडा सध्या काय करतोय ? जाणून घ्या याबद्दल

२०१८ म्हणजे मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजेच १६ नोव्हेंबरला नागराज मंजुळे यांचा ‘नाळ’ चित्रपट सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. आणि या चित्रपटाला आणि त्यामधल्या जाऊ दे नवं या गाण्याला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर चांगला प्रतिसाद हा मिळाला होता.या चित्रपटात चैतूची भूमिका साकारणारा बालकलाकार श्रीनिवास पोकळे याने तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. पण आता सध्या श्रीनिवास हा कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार व सध्या तो काय करत आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण सर्वच जण उत्सुक आहोत.

बालकलाकार श्रीनिवास पोकळे हा मूळचा अमरावतीचा असून तो पाचवीला आहे. श्रीनिवासने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नाळ चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने सांगितले की, नाळ चित्रपटाच्या आठवणी आजही माझ्या मनात अधिराज्य करत आहेत. शूटिंगच्या वेळी आम्हाला सहा वाजता सकाळीच उठाव लागत.

नदी कडच्या पाण्यात चित्रपटाचे शूटिंग होते. ऐन एवढ्या थंडीमध्ये पाण्यात उतरावे लागत. नाळ चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्या कलाकारांची मला आता खूप आठवण येते.

नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासने राजकुमार आणि सुधाकर रेड्डी जॉर्ज रेड्डी नावाचा एक तेलुगु चित्रपट केला आहे. हा चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. यात त्याने मुख्य अभिनेत्याच्या बालपणाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी त्याने तेलुगु भाषेचे धडेदेखील गिरविले.

नाळ चित्रपटानंतर श्रीनिवासला मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळाली होतो. त्यामुळे त्याचे पालक अगदीच खूश आहेत. आणि त्यांना आपल्या पाल्याचा खूप खूप अभिमान वाटत आहे. त्याने अभिनय क्षेत्रातच करियर करावे, अशी त्यांची इच्छा आहे.

Team Hou De Viral