निधन होयच्या अगोदर अतिशय वाईट अवस्था झाली होती नयनतारा यांची, वाचून तुमच्या डोळ्यांत पाणी येईल

निधन होयच्या अगोदर अतिशय वाईट अवस्था झाली होती नयनतारा यांची, वाचून तुमच्या डोळ्यांत पाणी येईल

अशी ही बनवाबनवी हा चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात खूप मोठी जागा निर्माण केली होती. या चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.या चित्रपटाला रिलीज होऊन आज कित्येककाळ उलटला आहे. परंतु या चित्रपटाची लोकप्रियता त्यावेळी जशी होती तशीच आजपण आहे. या चित्रपटामध्ये लिलाबाई काळभोर हे पात्र ज्येष्ठ अभिनेत्री नयनतारा यांनी साकारले होते.अनेक वर्षं मराठी चित्रपटसृष्टी व नाट्यसृष्टी अभिनेत्री नयनतारा यांनी गाजवली. असे म्हंटले तरी चालेल. कारण त्यांचा अभिनयच असा होता की नेहमीच त्यांच्या अभिनयाचे कौतुक हे होत असे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकापेक्षा एक हिट चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीला दिले.

ऑन स्क्रीन लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आई म्हणून ओळखल्या गेल्या

शांतेचे कार्ट चालू आहे हे नाटक लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला आले होते. तुम्हाला तर आठवत असेलच ना… या नाटकामध्ये लक्ष्मीकांत यांच्या मातोश्रीच्या पात्रामध्ये नयनतारा यांना बघितले गेले होते.या नाटकामध्ये नयनतारा आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची अभिनयाची दिसणारी जुगलबंदी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.

आणि नंतर बऱ्याच चित्रपटामध्ये त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आईची भूमिका पार पाडली.आणि याचमुळे त्यांना ऑन स्क्रीन वरील लक्ष्मीकांत यांची आई असे देखील म्हटले जात असे.तू सुखकर्ता, आई पाहिजे, आधार, बाळा गाऊ कशी अंगाई खुळ्यांचा बाजार, धांगडधिंगा यांसारख्या बऱ्याच चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक हे झाले.

अभिनेत्री नयनतारा यांचे 2014 साली निधन झाले. निधन व्हायच्या अगोदर त्यांना आधीपासून डायबेटीस होता. आणि या आजारामुळे त्या चांगल्याच त्रस्त झाल्या होत्या. आणि म्हणूनच आजारामुळे त्यांच्या निधनाच्या आठ वर्ष अगोदर त्यांचा डावा पाय शस्त्रक्रिया करून काढून टाकण्यात आला होता.

राहिलेली काही वर्षं त्या सतत आजारी असल्यामुळे जवळपास 10 वर्षं तरी त्या चित्रपटसृष्टी पासून दूर होत्या. त्यांनी माऊली प्रॉडक्शन, कलावैभव, चंद्रलेखा आणि नाट्यसंपदा या नाट्यसंस्थांच्या नाटकांत भूमिका साकारल्या होत्या.अशी ही बनवाबनवी या चित्रपटातील त्यांची भूमिका तर आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे.

Team Hou De Viral