नेहा पेंडसेच्या नवऱ्याची पहिली बायको आहे तिच्यापेक्षा सुंदर, पाहा फोटो !

नेहा पेंडसे व तिचा पती शार्दुल बायस यांची माघील काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा चालू आहे. आणि यांनी अखेर 5 जानेवारीला लग्न केले आहे.
या लग्न सोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तसेच सर्व चाहत्यांचे लक्ष या फोटोंनी वेधून घेतले आहे. शार्दुल हा अस्सल मराठी तडका मराठमोळ्या पेहरावामध्ये दिसला तर दुसरीकडे नेहा गुलाबी रंगाच्या नऊवारी साडीमध्ये एकदम सुंदर दिसत होती. नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नसोहळ्याला कुटुंबातील लोक आणि जवळचे काही मित्रमैत्रीण हजर होते.
नेहाचा पती शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. प्रेम हे आंधळं असतं आणि त्याचमुळे नेहाला तिचा लाइफ पार्टनर मिळाला आहे. पण, शार्दुलची दुसरी बायको आहे तरी कोण हे तुम्हाला माहित आहे का ?
स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार शार्दुलच्या पहिल्या बायकोचं नाव नेहा बोरा होते.तर, दुसऱ्या बायकोचे नाव अनीता अग्रवाल असून ती एक बिझनेसवूमन आहे. एवढचं काय शार्दुलला दोन मुलीही आहेत. रिया आणि आलिया असं त्याच्या लेकींची नावं आहेत. शार्दुलचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. त्यामुळे नेहा त्याची तिसरी पत्नी आहे.
शार्दुलच्या घटस्फोटाविषयी नेहा म्हणाली – नेहा आणि शार्दुल यांच्या लग्नाच्या फोटोंनी नेटकऱ्यांना भूरळ घातली आहेत. लग्नानंतरचे आता त्यांच्या रिसेप्शन आणि लग्नानंतरचे फोटो चांगलेच व्हारल होत आहेत. शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला असल्याने नेटकऱ्यांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु होती. पण, त्या सर्वांना बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नेहाने सेडेतोड उत्तर दिलं आहे.
नेहा म्हणाली, “ही काही मोठी गोष्ट नाही की शार्दुलचा दोन वेळा घटस्फोट झाला आहे. लग्नाआधीच मला याची पूर्ण कल्पना होती. याचा मोठा इशू करण्याची गरज नाही. शिवाय मीसुद्धा वर्जीन नाही. मी याआधी तीन रिलेशनशिपमध्ये होते. मी शार्दुलच्या पहिल्या बायकोला आणि त्याच्या मुलींना भेटले आहे.”
लग्नाविषयी बोलताना नेहा म्हणाली, ‘माझ्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न करुन मी खूप आनंदी आहे. य निर्णयाने मी अत्यंत खूष आहे. या परिवाराचा हिस्सा होताना मला आनंद होत आहे.शार्दुलला दोन गोंडस मुली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्याचं दोन वेळा लग्न झालं आहे हे मला त्याने लग्नाआधीच सांगितलं होतं. त्याने माझ्यापासून कोणतीच गोष्ट लपवली नाही. याआधी त्याचं लग्न झालं या गोष्टीचा मला मात्र फरक पडत नाही’.
बॉलिवूड चित्रपटांशिवाय नेहाने मराठी आणि तमिळ सिनेमांमधूनही काम केलं आहे. छोट्या पडद्यावरही ती झळकली आहे. ‘ मे आय कमइन मॅडम’ य़ातून ती दिसली. शिवाय सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ मध्येही ती होती. यातूनच तिला अधिक लोकप्रियतता मिळाली.