पक पक पकाक चित्रपटातील अभिनेत्रीने केले गुपचूप लग्न, यामुळे लग्नाची बातमी लपवली

बऱ्याच अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नाची बातमी ही सोशल मीडिया ते सर्वांपासून लपवलेली अनेक उदाहरणं आपण पाहिलेली आहेत. आणि आता या यादीत अजून एका मराठी अभिनेत्रीच्या नावाची भर होणार आहे.
परंतु तिच्या लग्नाची बातमी तिने सगळ्यांपासून का लपवून ठेवली याचे नेमकं कारण समजु शकले नसले तरीही ही अभिनेत्री सध्या काय करते आणि कुठे आहेत याबाबत चर्चा चालू असते.
गुपचूप लग्न – “पक पक पकाक” या मराठमोळ्या चित्रपटातून मराठी रसिकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नारायणी शास्त्री. 2015 मध्ये तिने तिचा फॉरेनर बॉयफ्रेंड स्टीवन सोबत गुपचूप लग्न केले व संसाराला सुरुवात केली.
खरतर तिला तिच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर म्हणजेच जगजाहीर करायचीच नव्हती. लग्नामुळे भेटणारी पब्लिसिटी तिला नको होती. तिने एका मुलाखतीत सांगितले की लग्न हा माझा खाजगी विषय आहे. माझ्या लग्नाची चर्चा का व्हावी.
खाजगी आयुष्य वादाच्या भोवऱ्यात – नारायणी शास्त्री ही “क्युंकी सांस भी कभी बहू थी” मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. ‘कुसुम’, ‘पिया का घर’, ‘नमक हराम’, ‘रिश्तों का चक्रव्यूह’, ‘फिर सुबह होगी’, ‘लाल इश्क’ अशा बऱ्याच टीव्ही मालिकेतून तिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. आणि विशेष म्हणजे तिच्या प्रोफेशनल करिअरपेक्षा तिच्या खाजगी आयुष्यावरच जास्त चर्चा रंगली होती. आणि यामुळेच कदाचित तिचे खाजगी आयुष्य अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले बघायला मिळाले होते.
अनुज सक्सेना नावाच्या बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिचा को-स्टार असलेल्या गौरव चोप्रा सोबत तिचे नाव जोडले जात होते. गौरव चोप्रा व नारायणी या दोघांनी मिळून ‘पिया का घर’, ‘घर घर की लक्ष्मी’,’बेटीयाँ’ सारख्या मालिकेत काम केले. मालिकेच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली व त्या मैत्रीचेच रूपांतर हे प्रेमात झाले. मात्र हे नाते काय जास्त काळ टिकले नाही.
वाईट व्यसनामुळे दुरावा – नारायणीला स्मोकिंगची सवय होती आणि हीच गोष्ट गौरवला पसंत नव्हती अनेकदा नारायणीला गौरवने स्मोकिंग करण्यापासून थांबवले होते. मात्र तरीही नारायणीचे स्मोकींग सुरू असल्याचे पाहून गौरव चोप्राने तिच्यापासून दूर राहणे पसंत केले होते.