पोटाचे विकार ते या विकारांवर रामबाण उपाय आहे “पेरू”

हिवाळ्यात बाजारामध्ये पेरू हे फळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध राहते. पेरूची चव गोड असते आणि त्यामुले आपल्याला सर्वांना गोड पेरू हा आवडतोच; परंतु तुम्हाला पेरु पासून आपल्या आरोग्याला काय काय फायदे मिळतात हे माहिती आहेत का ? म्हणजे दिसायला हे फळ लहान जरी दिसत असले तरीही आरोग्यासाठी ते उत्तम आहे.
पेरूची प्रकृती ही थंड स्वरूपाची असते. त्यामुळे पोटाचे अनेक विकार दूर करण्यासाठी हा एकदम सोप्प आणि रामबाण उपाय आहे. पेरूमध्ये लहान लहान बिया असतात, ज्या उत्तम तंतूमय पदार्थयुक्त असतात. त्यामुळेच पेरूचे नियमित सेवन केल्यास बद्घकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यसाठी सी जीवनसत्त्व आवश्यक असते, पेरूमध्ये सी जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळेच पेरूचे सेवन रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होण्यास मदत होते. पेरूमध्ये कोलेस्ट्रॉल खूप कमी प्रमाणात असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पेरूचे सेवन उपयुक्त आहे.
पेरूचे सेवन केल्याने आपल्याला कमी भूक लागते आणि पोट भरल्यासारखे वाटत राहते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठीही पेरूचे सेवन उपयुक्त ठरते. पेरूमध्ये लायकोपीन नावाचे अँटिऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखता येते.
पेरूत असणारे ए जीवनसत्त्व डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते. पेरूच्या पानांचाही औषधी उपयोग होतो. पेरूची पाने चावल्याने तोंड येणे किंवा तोंडात आलेले फोड बरे होतात.