पोटाच्या विकारांवर गुणकारी आहे आंबड-गोड द्राक्ष, ‘हे’ आहेत फायदे

हिवाळा म्हणजे द्राक्षांचा रिझन. आंबट गोड आणि चविष्ट आणि पौष्टिक आणि पचण्यास सुलभ असं फळ म्हणजे द्राक्ष . भरपूर ऊर्जा मिळवून देणारं आणि अन्नमूल्ये, खनिजं आणि जीवनसत्त्वांनी भरलेलं आहे. त्यामुळे त्याचे अनेक फायदे आहेत. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आवडणाऱ्या या आंबट गोड फळाचे फायदे काय आहेत पाहा.
1.द्राक्षाने शरीरातलं रक्त वाढण्यास मदत होते. मुलांच्या वाढीसाठी द्राक्ष उत्तम फळ आहे. ताप, पचनशक्ती मंदावणे यावर द्राक्ष गुणाकारी आहे.
2.नशापानावरही द्राक्ष फायदेशीर आहेत. दारूची सवय सोडण्यासाठी द्राक्षाहाराचा उपयोग होतो. दारूच्या आठवणीने व्याकूळ होणाऱ्या रुग्णांना द्राक्षाचा रस द्यावा.
3.बध्दकोष्ठतेचा त्रास जाणवल्यास द्राक्ष खा. पोट साफ होण्यास मदत होईल. तंतुमय पदार्थ, साखर आणि सेंद्रिय आम्ल द्राक्षांमधील या घटकांमुळे द्राक्ष शरीरासाठी खुप पौष्टिक आहे.
4.दम्यावरील उपचारांमध्ये द्राक्ष खाल्लेली चांगली असतात. असं अनेक डॉक्टरांचं म्हणणं आहे. द्राक्षांच्या बागेत बऱ्याच काळ बसूनही दम्याच्या रोगाला लवकर आराम पडतो.
5.द्राक्ष हृदयाला बळकट बनवतात. हृदयरोगाचा झटका आला असल्यास द्राक्षे हृदयाची दुर्बलता कमी करून ठोके नियमित करतात. काही दिवस फक्त द्राक्षाचा रस पिल्यानेही हृदयरोगास फायदेशीर आहे.
6.डोकेदुखीवर द्राक्षाचा रस एक उत्तम घरगुती औषध आहे.
7.द्राक्षांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते त्याचबरोबर पोटॅशियम क्षार असतात. द्राक्षांमध्ये मीठाचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे मुतखडा, मूत्रपिंडाच्या तक्रारी, लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदनांवर द्राक्ष उपायकारक आहे.
8.द्राक्षात असतं पॉलीफिनॉल कंपाउंड. त्यामुळे मेंदूतल्या पेशींसाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे भीती वाटणं, उदास वाटणं या गोष्टी दूर होतात.
9.द्राक्ष लाल, हिरवी आणि काळी असतात. ही द्राक्षं ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवतात. यासोबत शरीरात ऊर्जा निर्माण करतात. डायबेटिस असणाऱ्या रुग्णांनी डाॅक्टरांना विचारूनच द्राक्षं खावीत.
10.त्वचेची अॅलर्जी असेल तरी द्राक्षांचं सेवन फायदेशीर आहे. 1 कप लाल आणि हिरव्या द्राक्षांत 104 किलो कॅलरी, 1.09 ग्रॅम प्रोटीन, 0.24 ग्रॅम फॅट, 1.4 ग्रॅम फाइबर आणि 27.33 ग्रॅम कार्बोहाइड्रेट असतात.