‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ फायदे

‘पौष्टिक’ रताळे आरोग्यासाठी वरदान, होतात ‘हे’ फायदे

आपल्या आरोग्याबाबत थोडे जागृक होऊन योग्य आहार व व्यायाम आपण करायला हवा. आपण जो आहार घेत आहोत त्याद्वारे अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घ्यावी. आपण सर्वसामान्य लोक रताळं हे केवळ उपवासाच्या दिवशीच खातो. परंतू त्यामध्ये असणारे पोषक घटक हे आपले स्वाथ्य सुधारण्या बरोबर आपले वजन कमी करण्यात फायदेशीर ठरते.

रताळ हे फायबरने परिपूर्ण असते

रताळ्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते त्यामुळे वेळी-अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवणे आपल्याला शक्य होते. मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने रताळं खाल्ल्यानंतर आपल्याला खूप वेळ पोट भरलेले आहे असे वाटते आणि भूकेवर नियंत्रण मिळवता येते. एक मध्यम आकाराच्या रताळ्यामध्ये सुमारे चार ग्राम फायबर असते. म्हणूनच उपवासाच्या दिवसाव्यक्तिरिक्त ऐरवी रताळ्याचा आहारात समावेश करा.

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते

रताळ्यात कार्ब्सचे प्रमाण जास्त असले तरीही त्यामधून शरीराला adiponectin नामक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणार्‍या हार्मोन्सला चालना देण्याचे काम करते. असे Cochrane Database of Systematic Reviews जर्नलचे मत आहे.

रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते. रताळ्यामध्ये ग्ल्यासमिक इंडेक्स कमी असल्याने रक्तातील साखर झटकन वाढत नाही. त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी रताळं वाफवून आहारात घ्यावे.

नैसर्गिकरित्या चव ही गोड असते

रताळ हे नैसर्गिकरित्या गोड असल्यामुळे हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. हेल्दीफाय मी च्या मते, एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.

तुमची गोड खाण्याची इच्छा पूर्ण करायची असल्यास रताळ्याचं कस्टर्ड हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे कमरेचा वाढता घेर आटोक्यात राहण्यास मदत होते. सोबतच रताळ्यामध्ये व्हिटामिन ए मुबलक आढळते. परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.

Team Hou De Viral