फणस खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, एकदा फायदे जाणून घ्या!

फणस खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, एकदा फायदे जाणून घ्या!

इथे खूप कमी लोक असतील ज्यांना फणसा पासून तयार केलेली मसालेदार भाजी आवडत नसेल. आता काही लोक फणसाला फळ मानतात तर काही लोक फणसाला भाजी.

तर काही लोक फणसाच्या या भाजीला नॉनव्हेज करीता ऑप्शन म्हणून देखील गृहीत धरतात.

काहींच्या घरामध्ये फणसाची भाजी केली जाते तर काही लोकांच्या घरी फणसाचा लोणचं, भजी तसेच कोफ्ता देखील तयार केला जातो.

काही लोकांना तर पिकलेला फणस आवडतो.आणि आता तर फणसाचा काळ सुरू होईल. फणस हे माणसाच्या तब्बेती करता एकदम चांगल मानले जाते. फणसात व्हिटॅमिन ए, सी, थाइमिन, पोटॅशियम, कॅल्‍शियम आणि आयर्न असते.
फणसाच्या गऱ्यांचं एकत्र मिश्रण तयार करून त्याला पाण्यात उकळवा. हे पेय हृदयरोग असलेल्यांना पेशंटला दिल जातं. थाॅयराॅईड असलेल्यांनी फणस खावा. त्यात असलेले खनिज आणि काॅपर थायराॅईडला नियंत्रणात ठेवतं.आणि तुम्हाला जर पिकलेला फणस खायला अतिशय आवडतं असेल तर त्यातील गरे काढून पाण्यात उकळून ते प्या. असे केल्याने शरीरात एक प्रकारे उत्साह राहतो.

फणसात विटामीन ए असल्यामुळे डोळ्यांना यामुळे अतिशय फायदा होतो. आणि त्वचा अतिशय चांगली होते.
फणस खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास मदत होते. फणसामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं. त्यामुळे नियमित सेवनानं बद्धकोष्ठता जाते. पचनाच्या समस्या संपतात.

Team Hou De Viral