फरहान अख्तर या मराठमोळ्या मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ

फरहान अख्तर या मराठमोळ्या मॉडेलसोबत बांधणार लग्नगाठ

जवळजवळ दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर आता लग्नाच्या मूडमध्ये दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार हे दोघेही याचवर्षी लग्न करणार आहेत नात्याला

मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने यावर्षी लग्न करण्याची तयारी केली आहे. फरहानचा आगामी चित्रपट ‘तुफान’ प्रदर्शित झाल्यानंतर वर्षाच्या अखेरीस फरहान लग्न करण्याचा विचार करत आहे. परंतु तो हे शुभ कार्य लवकर सुद्धा उरकून टाकू शकतो आणि लोकांना आश्चर्यचकित करू शकतो. अद्याप त्याने अंतिम तारीख निश्चित केलेली नाही, परंतु फरहान आणि शिबानी यांनी त्यांच्या खास दिवसाची तयारी सुरू केली आहे.

अलीकडेच फरहान अख्तरच्या वाढदिवशी शिबानीने त्याच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोसोबत कॅपशनमध्ये शिबानीने लिहिले की, ‘माझ्या आयुष्यात आनंद आणि प्रेमाची जादू भरवल्याबद्दल धन्यवाद. मी आजपर्यंत भेटलेल्या चांगल्या लोकांपैकी हा एक आहे. खरं तर, जगाला आपल्यासारख्या अधिक लोकांची गरज आहे.

पुढे शिबानीने लिहिले, ‘तुमच्यासारखा दयाळू, जागरूक, निःस्वार्थ व शूर व्यक्ती मी कधी पाहिलेला नाही. मी तुमच्यासोबत राहून बरेच काही शिकले आहे. तू मला चांगले काम करण्याची प्रेरणा दिलीस. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक ठिकाणी मला सामावून घेतल्याबद्दल धन्यवाद, मला खूप विशेष वाटले आणि आमच्या दोघांसाठी नेहमी वेळ दिला.

सुरुवातीला या दोघांनी आपलं नातं लपवून ठेवलं होत. सप्टेंबर महिन्यात शिबानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिने कोणाचा तरी हात धरलाय परंतु चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

यासह अफवा फिरण्यास सुरुवात झाली की तो फरहान अख्तर आहे. त्यानंतर थोड्याच वेळात फरहानने हेच चित्र आपल्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. त्यानंतर फरहान आणि शिबानी एकमेकांना डेट करत असल्याची पुष्टी झाली.

Team Hou De Viral