बटाटा आवडतो? मग बिंधास्त खा, नाही वाढणार वजन! जाणून घ्या खाण्याची नवी पद्धत.

बऱ्याच लोकांना असे वाटते की, बटाट्याचे सेवन केल्यामुळे वजन वाढत. आणि म्हणून काही लोक बटाट्याचे पदार्थ अथवा बटाट्याची भाजी खाण्याचा मोह अनेकदा आवरतात. परंतु खरच बटाटे खाल्ल्याने वजन वाढते का? तर एका रिचर्समध्ये असे आढळले आहे की बटाटा खाल्ल्याने वजन कमी होईल.
युकेतील युनिव्हर्सिटी ऑफ लीड्सच्या संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे.
सर्वात पहिल्यांदा, बटाट्यामध्ये कोणते पोषक घटक आहेत हे जाणून घ्या. कार्बोहायड्रेट्स व्यतिरिक्त बटाट्यांमध्ये असलेले पोषक आणि फायबर पाचन तंदुरुस्त ठेवतात.
बटाटेमध्ये अँटी-ऑक्सिडेंट आढळतात आणि ते आपल्या शरीराचे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या हानी पासून बचाव करतात. बटाटामध्ये सुमारे 45 टक्के जीवनसत्व सी आढळते. बटाट्याचा ताण संप्रेरक सोडण्यापासून देखील प्रतिबंधित करते.मात्र बटाट्यात पिष्टमय पदार्थ स्टार्च, लोह आणि जस्त देखील असते.
बटाट्यात असणाऱ्या कार्बोहायड्रेट्स मुळे आपल्या शरीरात बळ येते. त्यामुळं तळलेल्या बटाट्याने आपले वजन वाढते तर तोच बटाटा उकळला तर वजन कमी होते.
लीड्स विद्यापीठाच्या संशोधनात असे आढळले आहे की बटाटे, तांदूळ आणि पास्ता यासारखे पदार्थ चरबी वाढवतात. त्यामुळे या संशोधनात आहारात दोन वेगवेगळ्या प्रकारचे गट तयार केले गेले.
पहिल्या गटाला उर्जा वाढवणारा आहार देण्यात आला तर दुसर्या गटाला दिवसाला 1400 कॅलरी आहार देण्यात आला. पहिल्या गटात भाग घेणाऱ्या लोकांचे वजन 14 आठवड्यांत सहा किलोने कमी झाले कारण यात बटाटा उकळून देण्यात आला होता.
तर, दुसर्या गटाने केवळ तीन किलो वजन कमी केले. म्हणून बटाटा खा पण उकळवून किंवा बेक करून. मात्र बटाटा हा चीज, मलई, सोयाबीनसोबत खाऊ नका. यामुळं तुमचे वजन वाढेल.