बाबोव ! लाखमोलाचा नाही करोडोंचा डान्स; बॉलिवूडच्या या आयटम गर्ल्स एका गाण्यासाठी घेतात इतके मानधन

बाबोव ! लाखमोलाचा नाही करोडोंचा डान्स; बॉलिवूडच्या या आयटम गर्ल्स एका गाण्यासाठी घेतात इतके मानधन

आजकाल बऱ्याचशा बॉलिवूड चित्रपटांमध्ये आयटम साँग पाहायला मिळतात. उडत्या चालीच्या गाण्यावर अभिनेत्रींनी धरलेला ठेका पाहून अनेक वेळा आपलेही पाय थिरकू लागतात.

विशेष म्हणजे काही चित्रपट असे आहेत जे केवळ आयटम साँगमुळे चर्चेत आले होते. आयटम साँग हिट झाले कि चित्रपट हिट व्हायला खूप मदत मिळते. परंतु आयटम साँगमध्ये नृत्य करणाऱ्या अभिनेत्री एका डान्ससाठी प्रचंड मानधन घेत असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे त्यांचं हे मानधन कोटी रुपयांच्या घरात असतं.

प्रियांका चोप्रा – ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा फार कमी वेळा आयटम साँग करताना दिसते. परंतु तिने केलेलं ‘रामलीला’ चित्रपटातलं आयटम साँग तुफान गाजलं होतं.

या गाण्यात तिने तिच्या नृत्याने आणि चेहऱ्यावरील हावभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. प्रियांकाने ‘राम चाहे लीला’ या गाण्यावर डान्स केला होता. या गाण्यासाठी तिने तब्बल ६ कोटी रुपये मानधन स्वीकारलं होतं.

करिना कपूर – ‘फेव्हिकॉल से’ या गाण्यात अभिनेत्री करिना कपूरने डान्स केला होता. हे गाणं २०१२ साली प्रदर्शित झालेल्या ‘दबंग २’ या चित्रपटातलं होतं. या गाण्यासाठी करिनाने तब्बल ५ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची चर्चा आहे.

सनी लिओनी – पॉर्नपटांना अलविदा करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनीचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे सहाजिकचं तिचे आयटम साँग चांगलेच लोकप्रिय होणार.

अनेक चित्रपट निर्मात्यांचीदेखील आयटम साँगसाठी पहिली पसंती सनीलाच असते. शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात सनीने ‘लैला मैं लैला’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला होता. या गाण्यासाठी तिने ३ कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं जातं.

कतरिना कैफ – ‘अग्निपथ’ चित्रपटातील ‘चिकणी चमेली’ हे गाणं साऱ्यांच्याच लक्षात असेल. या गाण्याने तुफान लोकप्रियता मिळविली होती. त्यामुळे आजही हे गाणं बऱ्याचदा तरुणाईच्या ओठी ऐकायला मिळतं. या गाण्यात कतरिनाने डान्स केला होता.

चिकणी चमेली’मध्ये कतरिनाने जबरदस्त डान्स केल्यामुळे तिला काही चाहत्यांनी चिकणी चमेली हे नावंदेखील ठेवलं होतं. या गाण्यासाठी कतरिनाने ३.५ कोटी रुपयांचं मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.

दीपिका पदुकोण – बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणने सध्या तिचं लक्ष अभिनयावर केंद्रीत केलं आहे. त्यामुळे ती फार कमी वेळा आयटम साँग करताना दिसते. परंतु ती एक उत्तम डान्सर असून ‘दम मारो दम’ या चित्रपटातील तिचं आयटम साँग चांगलीच लोकप्रिय झालं होतं.

२०११ साली अभिषेक बच्चनची मुख्य भूमिका असलेला ‘दम मारो दम’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटातील टायटल साँगमध्ये दीपिका आयटम गर्लच्या रुपात दिसून आली होती. या गाण्यासाठी तिने १.५ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. दीपिका सध्या टॉपची अभिनेत्री असल्यामुळे ती शक्यतो आयटम साँग नाकारताना दिसते.

मलायका अरोरा – बॉलिवूडमध्ये करिअर सुरु केलेल्या मलायकाची अनेक वेळा प्रथम ओळख आयटम गर्ल या नावानेच केली जाते.

मलायकाला ‘छैय्या छैय्या’ या गाण्यामुळे तुफान लोकप्रियता मिळाली. या गाण्यानंतर तिला ‘रंगीलो मारो ढोलना’, ‘ओंठ रसिले तेरे ओंठ रसिले’, ‘अनारकली डिस्को चली’ या आयटम साँगमध्ये डान्स करण्याची संधी मिळाली.

‘दबंग’ चित्रपटातील ‘मुन्नी बदनाम हुई’ या गाण्यामुळे ती प्रचंड चर्चिली गेली. हे गाणं आजही तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे तरुणाईला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यासाठी मलायकाने तब्बल २ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येतं.

Team Hou De Viral