‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळेनं केलंय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ फेम सुमित पुसावळेनं केलंय बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम

सध्याच्या या चालू काळात पौराणिक आणि ऐतिहासिक कथा असणाऱ्या मालिकांना प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. आणि सध्याच्या घडीला आघाडीवर असणारी मालिका म्हणजे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’.

अभिनेता सुमीत पुसावळे याने मालिकेत मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सुमीतने अगोदर ‘सरगम’ या चित्रपटात तर ‘लागीरं झालं जी’ या झी मराठी वरील लोकप्रिय मालिकेतही काम केलं आहे. अभिनयाच्या या क्षेत्रात नाम कमावणाऱ्या सुमीतने बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबत सुद्धा काम केल आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ च्या बातमीनुसार, मराठी मालिकांत काम करण्या अगोदर सुमीतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय. प्रियांका चोप्राच्या एका चित्रपटासाठी सुमीतने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.

कोल्हापुर मधल्या दिघंजी या गावात सुमीतचा जन्म झालेला आहे. त्यानं पुणे विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने तीन वर्षे विविध हॉटेल मॅनेटमेंज कंपन्यांमध्ये काम केलं. मात्र अभिनयाची आवड त्याला काय स्वस्थ बसू देत नव्हती. लहानपणापासूनच त्याला अभिनयाचं वेड होतं. अभिनयाच्या वेडापायी सुमीतने नोकरी सोडली आणि मॉडेलिंग केलं.

‘सरगम’ या चित्रपटातून सुमीतने पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने दिग्गज अभिनेते गिरीश कर्नाड यांच्यासोबत काम केलं. २०१८ मध्ये सुमीतने ‘लागीरं झालं जी’ या मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. या मालिकेनंतर त्याने पुन्हा कधी मागे वळून पाहिलं नाही.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत त्याने महाडिक राजे यांची भूमिका साकारली होती. यासोबतच सुमीतने नाटकातही काम केलंय.

Team Hou De Viral