बाहुबलीतला हा खतरनाक विलेन, खऱ्या आयुष्यात दिसतो असा, 6 वर्ष बेरोजगारी, पत्नी आहे अभिनेत्री सारखी, जगतो असे जीवन

माघे खूप प्रतीक्षेनंतर ‘बाहुबली 2’ सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. पण यावेळी बाहुबली वन मधला खलनायक कालकेय या पार्ट 2 मध्ये दिसला नाही. वेगळ्या प्रकारची आणि विचित्र भाषेत बोलणाऱ्या कालकेयच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले. पण तुम्हाला कालकेयचं खरं नाव माहित आहे का?
वास्तविक, कालकेयाची व्यक्तिरेखा प्रभाकर या दाक्षिणात्य अभिनेताने साकारली होती. बाहुबलीच्या आधी प्रभाकर याने एस.एस. राजामौलीच्या ‘मगधीरा’ चित्रपटातही काम केले आहे. आणि हो तो ‘मर्यादा रमन्ना’ या चित्रपटातून लाईम लाइटमध्ये आला होता.
प्रभाकर हा तेलंगणाच्या महबूबनगर जिल्ह्यातील कोडंगल या छोट्याशा गावातला आहे. बाहुबलीत भयानक दिसणारा प्रभाकर खऱ्या आयुष्यात अत्यंत लाजाळू आहे. एका मुलाखती दरम्यान प्रभाकर म्हणाला होता की मला कधीही चित्रपटांमध्ये काम करायचं नव्हतं.
प्रभाकर म्हणतो, मी बालपणी क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहत असे. एकदा बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी एका लग्नाला हजर होण्यासाठी हैदराबादला आलो. माझे व्यक्तिमत्त्व पाहून नातेवाईकाने मला रेल्वे पोलिसांकडून नोकरी देण्याचे वचन दिले.

मला या नोकरीची 6 वर्षे वाट पाहावी लागली पण मला नोकरी मिळाली नाही. यानंतर मी हैदराबादला आलो आणि दुसरी नोकरी शोधण्यास सुरवात केली.
प्रभाकर म्हणतो की नोकरीच्या शोधात असताना मला कळले की दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांना ‘मगधीरा’ चित्रपटासाठी काही लोकांची गरज आहे. माझ्या मित्राने मला जिथे निवड होते तिथे नेले. त्या वेळी ते मला काही बोलले नाही.
तिथून राजामौली मला राजस्थानला घेऊन गेले. मगधीराची शूटिंग राजस्थानमध्ये चालू होती. मी तिथे काही काम पाहिले. त्यानंतर हैदराबादला परत आलो आणि नोकरी शोधू लागलो. यावेळी राजामौलीच्या सहाय्यकाचा फोन आला. तो मला त्याच्या घरी घेऊन गेला. तिथे राजामौलीने मला मर्यादा रामन्ना या चित्रपटातील एका भूमिकेची ऑफर दिली.
पण मला अभिनयबद्दल काहीच माहिती नव्हते. राजामौलीने मला देवदास कनकला मध्ये अभिनय शिकण्यासाठी पाठवले. तसेच तेव्हा प्रभाकर यांना दरमहा दहा हजार रुपयांचा स्टायपेंड मिळायचा. या पैशाने प्रभाकरने त्याचे सर्व कर्ज फेडले.
प्रभाकरच्या म्हणण्यानुसार, आज जे काही आहे ते फक्त दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांच्यामुळे आहे. राजामौलीने मला एक नवीन जीवन दिले आहे.बाहुबली व्यतिरिक्त मी 40 दक्षिण चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात सीमा तपकई, डुकडू, कृष्णम वंदे जगद्गुरुम अश्या चित्रपटांचा समावेश आहे.