बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या घरी रानु मंडलने मेड म्हणून काम केले होते, स्वतः केला खुलासा

बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या घरी रानु मंडलने मेड म्हणून काम केले होते, स्वतः केला खुलासा

गेल्या काही दिवसांपासून एक चेहरा आणि आवाज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रत्येकजणला त्यांच्या आवाजा आवडला आहे आणि प्रत्येकास एकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा आहे.एकेकाळी रेल्वे स्थानकात गाणे गाऊन पोट भरणाऱ्या या महिलेकडे आज बऱ्याच गाण्याच्या ऑफर आहेत आणि पहिली संधी बॉलिवूडचे लोकप्रिय संगीतकार हिमेश रेशमिया यांनी दिली.

आता तुम्हाला अंदाज आलाच असेल की आम्ही इंटरनेट वर व्हायरल झालेल्या रानू मंडलबद्दल बोलत आहोत. या अभिनेत्याचे घरी स्वयंपाक आणि साफसफाईचे काम रानू मंडलाने केले आहे,तर चला जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता ?गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत असलेल्या रानू मंडलाकडे आता अजिबात वेळ नाहीये. कोणाला त्यांच्यासह रेकॉर्डिंग करावयाचे आहे तर कोणाला त्यांची मुलाखत घ्यायची आहे.पण तुम्हाला माहीत आहे का यापूर्वीही रानु मंडल इंडस्ट्रीत आली होता.रानू मंडलाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले की, ती चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेता फिरोज खान यांच्या घरात मेड म्हणून काम करायची. रानूने फक्त त्यांच्या घरात अन्न शिजवण्याचे काम केले नव्हते तर स्वच्छतेचेही काम केले होते.

रानू मंडलाने आपल्या मुलाखतीत सांगितले, ‘मी फिरोज खानचा मुलगा फरदीन खान आणि त्यांचे काका याची खूप काळजी घेतली आहे. बंगाली असल्याने हिंदी बोलणे अवघड होते, तरीही मी त्यांचे बोलणे समजून घ्यायची आणि त्यांच्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ तयार करायची . ”याशिवाय हिमेश सरांनी तिला पहिली संधी दिली आणि ती मी कधीच विसरणार नाही असे रानू म्हणाली.एका टीव्ही शो दरम्यान जेव्हा रानू मंडला विचारले गेले की तुम्ही रेल्वे स्टेशनवर का गाणे गात असत ? तर या प्रश्नाचे उत्तर देतांना रानू म्हणाली की तिच्याकडे राहण्यासाठी घर नाही, ती स्टेशनवरच राहायची आणि जेव्हा ती गाणी गायची तेव्हा काही लोक बिस्किट किव्हा काही पैसे देत असत.रानू मंडलाला सातत्याने ऑफर येत आहेत आणि हिमेशनंतर आता भोजपुरी गायक-अभिनेता प्रदीप पांडे चिंटू यांनी सांगितले आहे की लवकरच तो राणूसोबत रेकॉर्डिंग करणार आहे.

Team Hou De Viral