‘माझा होशील ना’ मधला विराजस आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा तर गौतमीची बहीणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

‘माझा होशील ना’ मधला विराजस आहे या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा तर गौतमीची बहीणदेखील आहे प्रसिद्ध अभिनेत्री

झी मराठी वाहिनीवर लवकरच ‘माझा होशील ना’ ही नवी मालिका दाखल होत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, सुनील तावडे या कलाकारांसोबत दोन तरुण चेहरे दिसत आहेत.

या दोन कलाकारांची नावे आहेत विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे.या मालिकेतून हे विराजस, छोट्या पडद्यावर पदार्पण करत असून गौतमीची ही दुसरी मालिका आहे. विशेष म्हणजे या दोघांनाही अभिनयाची बाळकडू घरातूनच मिळाले आहेत.

कारण विराजसची आई तर गौतमीची थोरली बहीण मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा विराजस हा एकुलता एक मुलगा आहे. तर गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची धाकटी बहीण आहे.

रुपेरी पडद्यावर झळकला आहे विराजस

विराजस रंगभूमीवर अॅक्टिव असून त्याचे रुपेरी पडद्यावरही पदार्पण झाले आहे. अजय नाईक यांच्या ‘हॉस्टेल डेज’ या मराठी चित्रपटात तो झळकला होता. विशेष म्हणजे अभिनयासोबतच त्याला दिग्दर्शनाचीही आवड आहे.

मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘रमा माधव’ या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून धूरा सांभाळली होती. याशिवाय विराजसने आई मृणालसोबत स्क्रिनदेखील शेअर केली आहे. गौरव पत्कींच्या ‘आईची जय’ या शॉर्टफिल्ममध्ये मृणाल आणि विराजस आई-मुलाच्या भूमिकेत झळकले होते.

गौतमीची दुसरी मालिका

सोनी मराठी वाहिनीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेतून गौतमी घराघरांत पोहोचली आहे. नाटकं आणि एकांकिकामध्ये झळकलेली गौतमी इंजिनिअर असून गायिकासुद्धा आहे.

मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मनफकिरा’ या चित्रपटासाठी तिने पार्श्वगायनदेखील केले आहे. येत्या 2 मार्चपासून रात्री 8 वाजता विराजस आणि गौतमीची ‘माझा होशील ना’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Team Hou De Viral